Mobirise


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाबद्दल माहिती

अक्कलकोटचे ऐतिहासिक महत्व असून हे पूर्वी संस्थान होते. येथे राजघराण्याची गादी असुन भोसले हे संस्थानिक आहेत. श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले, पहिले शहाजीराजे, मालोजीराजे, फत्तेसिंहराजे तिसरे व श्रीमंत विजयसिंहराजे भोसले असे पराक्रमी व कर्तबगार राजे होऊन गेले. अक्कलकोट शहराची ख्याती सबंध महाराष्ट्रभर आणि देशभर पसरली ती म्हणजे दत्तावतारी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचेमुळे. श्री स्वामी समर्थाचा हा अवतार श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे कारकीर्दीत झाला. श्रीमंत मालोजीराजे भोसले हे स्वामी भक्त होते. अक्कलकोट मधील २२ वर्षांच्या वास्तव्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक चमत्कार करून यांची महती सर्व महाराष्ट्रभर पसरली. श्री. स्वामी समर्थाच्या या पावननगरी मध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी उचलुन धरली व २९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले.

अन्नछत्र

२९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले. या अन्नछत्राचे “श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट” असे नामकरण करण्यात आले. हया अन्नछत्राचा विस्तार व्हायला लागला. अन्नदानासाठी परगांवच्या भक्तांच्या देणग्या यायला लागल्याने ट्रस्ट स्थापनाची आवश्यकता भासु लागली. त्यामुळे सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी आपले निकटवर्तीयसंबधीत व सहकारी असलेल्या स्वामीभक्तांना सभासद करून घेऊन पब्लिक ट्रस्ट (सार्वजनिकन्यास) ची नोंदणी केली.
अन्नछत्र हे दुपारी 12 ते 3 व रात्री 9 ते 11 या वेळेत सुरू असते. गर्दीच्या वेळेस किवां उत्सवाच्या दिवशी हे अन्नछत्र अहोरात्र सुरू असते. येथे आलेला भक्त विन्मुख होऊन जात नाही. हे या अन्नछत्राचे विशेष आहे. अन्नछत्रात रोज अंदाजे १० हजार तर गर्दीच्या विशेष दिवशी सुमारे ३ लाख स्वामीभक्त महाप्रसाद घेतात. महाप्रसादाचा दररोजचा खर्च सरासरी 1 लाख ते दीड लाख रूपये इतका आहे. सदरचा महाप्रसाद (मोफत पुर्ण भोजन) मोफत असल्याने येथे कसल्याच प्रकारचे मुल्य त्यासाठी आकरले जात नाही. 

श्री. जन्मेजय विजयसिंहराजे भोसले.
सन्मा. संस्थापक अध्यक्ष 
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट.

ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी अन्नदानाच्या माध्यामातून सेवा रूजु करण्यासाठी समस्त स्वामीभक्तांनी या स्वामी कार्यास सढळ हाताने मदत करावी ही नम्र विनंती. अन्नदानाच्या माध्यामातून होत असलेल्या स्वामीकार्यात आपलेही योगदान असावे यासाठी परगांवाहून येणाऱ्या हजारो स्वामीभक्तांच्या महाप्रसादाची व त्यांच्या निवासाच्या व्यवस्थेकरिता आणि श्री स्वामी समर्थांचे पवित्र स्वामीकार्य अखंडीत व अविरतपणे स्वामी भक्तांनी अन्नदान व बांधकाम सेवेत मनापासून सहभागी व्हा.
|| श्री स्वामी समर्थ ||

अन्नछत्राची नवीन इमारत

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ {Trust F-2279} अक्कलकोट या संस्थानने नव्याने महाप्रसादगृहाची भव्य व देखणी इमारत बांधकाम अंदाजित रक्कम ११ कोटी रुपये खर्च अपेक्षित होणार असून हे बांधकाम लवकर पूर्ण करण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाआशिर्वाद आणि भक्तांचा स्वामीचा रुपात मिळणारा उदार आश्रय आणि अन्नदानाच्या कार्यात त्यागीवृतीने अहोरात्र परिश्रम करणाऱ्या सेवेकरयांचे योगदान यामुळेच अन्नछत्र मंडळाचे अल्पावधीतच वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
नियोजित महाप्रसादगृहाच्या बांधकामासाठी रु. ५००० ते रु. १०००० पर्यंत देणगी देणारया देणगीदाराचे नाव ग्रेनाईटच्या बोर्डावर कोरण्यात येईल आणि सदर ग्रेनाईट बोर्ड बांधकाम झाल्यावर महाप्रसादगृहात लावण्यात येईल आणि रु. १००००१ किंवा त्यापेक्षा जास्त देणगी देणारया देणगीदाराचे नाव मार्बल संगमरवर प्लेटवर कोरण्यात येईल आणि सदर मार्बल बोर्ड बांधकाम झाल्यावर महाप्रसादगृहात लावण्यात येईल. महाप्रसादगृह एकावेळेस २००० भाविक महाप्रसाद घेतील इतक्या क्षमतेचे असणार आहे. 

आयकराच्या 80 जी कलमान्वये देणगीस सुट सदरच्या देणग्या देणाऱ्या देणगीदारांना त्यांनी दिलेल्या देणगीस आयकरातुन सवलत मिळावी यासाठी आयकर अधिनियम १९६१ च्या कलम ८०जी अन्वये सवलत देण्यात आली आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट, सोलापूर.

☎ दुरध्वनी : कार्यालय : ०२१८१ – २२११८० / यात्री निवास : ०२१८१ - २२२५८७ / यात्री भुवन : ०२१८१ - २२२५५५
web: www.swamiannacchatra.org ✉ ई-मेल : contactus@swamiannacchatra.org

Follow On