श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट,अक्कलकोट
स्वामी समर्थ वाटिका व बालोद्यान
शिव चरित्र धातू चित्र शिल्प प्रदर्शन हॉल
शिवस्मारक (गड किल्ले सृष्टी) ची निर्मिती
अन्नछत्राचे भक्तिमय व प्रेरणादायी परिसर
अन्नछत्राचे भक्तिमय अध्यात्मिक परिसर
अन्नछत्राचा इतिहास
संथापक अध्यक्ष श्री.जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले (महाराज)

स्वागत आहे आपले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट,अक्कलकोट अधिकृत संकेतस्थळावर.

स्वामी समर्थ वाटिका व बालोद्यान खास परगावहून येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी एक विरंगुळ्याचे व आकर्षणाचे ठिकाण म्हणून त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. लहान मुलांसाठी खास खेळणी मागवलेली आहेत. तसेच नानाविध जंगली प्राण्याचे पुतळे बसविण्यात आलेले आहे. तसेच भाविकांना सकाळी फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक ची निर्मिती हि करण्यात आलेले आहे.

या प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चत्रीत्रावरील महत्वाच्या व ठळक घटनांच्या धातू चित्रांचा समावेश आहे. सदरची चित्रे एकूण ८१ चित्रे असून हि सर्व चित्रे ताम्रपटावर कोरलेले आहे. सदरचे प्रदर्शन हॉल चे उद्घाटन दिनांक २७ जुलै २०१८ गुरु पौर्णिमेच्या दिवशी झालेले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.

गानसाम्राज्ञी लता मंगेशकरांनी अन्नछत्रात शिवस्मारक उभे राहावे अशी इच्छा प्रकट केली होती. मा. श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शना खाली अन्नछत्रात भव्य अश्या शिवस्मारक (गड किल्ले सृष्टी) ची निर्मिती मा.श्री.जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी केली. इतिहासाचे स्मरण करून देणारी हि शिवसृष्टी अन्नछत्रा च्या विविध उपक्रमातील आणि अन्नछत्राच्या नेत्रदीपक वाटचालीतील एक मैलाचा दगड ठरत आहे.

अन्नछत्राचे भाविक आल्यावर त्यांना संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि अध्यात्मिक वातावरणाची प्रचीती येते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची मूर्ती ह्या वातावरणामध्ये शोभायमान आहे.

अन्नछत्राचे भाविक आल्यावर त्यांना संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि अध्यात्मिक वातावरणाची प्रचीती येते. ३० फुटाची भव्य स्वामी महाराजांची उभी मूर्ती, वडाच्या झाडाखाली असलेली त्यांची वात्सल्य मूर्ती, कपिला गाय, आणि त्या सोबत महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज ह्यांची मूर्ती ह्या सगळ्या गोष्टींमुळे परिसर सदैव चैतन्यमय आणि उर्जायुक्त असतो.

अन्न हे परब्रम्ह आहे ! अन्नदान सर्व श्रेष्ठ दान... असे म्हटले आहे. त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खुप मोठी आहे. अन्नाची गरज ही या भुतलावरील मानवासहीत सर्व प्राणीमाञांना आहे. अन्नग्रहणाने क्षुधा शमतेलअन्नामधे साक्षात र्इश्वराचा वास असतो, त्यामुळे हया महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तॄप्त होतो. एकप्रकारचे मानसिक समाधान मिळते.सध्या या अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस १५००० च्या वर परगांवचे स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात.

अन्नदानाच्या माध्यामातून होत असलेल्या स्वामीकार्यात आपलेही योगदान असावे यासाठी परगांवाहून येणाऱ्या हजारो स्वामीभक्तांच्या महाप्रसादाची व त्यांच्या निवासाच्या व्यवस्थेकरिता आणि श्री स्वामी समर्थांचे पवित्र स्वामीकार्य अखंडीत व अविरतपणे सुरु असावे ह्या करिता स्वामी भक्तांनी अन्नदान व बांधकाम सेवेत मनापासून सहभागी व्हावे हि नम्र विनंती.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र

अक्कलकोटचे ऐतिहासिक महत्व असून हे पूर्वी संस्थान होते. येथे राजघराण्याची गादी असुन भोसले हे संस्थानिक आहेत. श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले, पहिले शहाजीराजे, मालोजीराजे, फत्तेसिंहराजे तिसरे व श्रीमंत विजयसिंहराजे भोसले असे पराक्रमी व कर्तबगार राजे होऊन गेले. अक्कलकोट शहराची ख्याती सबंध महाराष्ट्रभर आणि देशभर पसरली ती म्हणजे दत्तावतारी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचेमुळे. श्री स्वामी समर्थाचा हा अवतार श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे कारकीर्दीत झाला. श्रीमंत मालोजीराजे भोसले हे स्वामी भक्त होते. अक्कलकोट मधील २२ वर्षांच्या वास्तव्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक चमत्कार करून यांची महती सर्व महाराष्ट्रभर पसरली. श्री. स्वामी समर्थाच्या या पावननगरी मध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी उचलुन धरली व २९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले.

गान साम्राज्ञी लता दीदी मंगेशकर

भारतरत्न गानसम्राज्ञी आदरणीय लतादिदी मंगेशकर आणि संस्था.अध्यक्ष मा. जन्मेजयराजे भोसले यांचेसमवेत अन्नछत्रात साकारण्यात येणाऱ्या शिवस्मारका विषयी चर्चा करताना.

श्री. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले

ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी अन्नदानाच्या माध्यामातून सेवा रूजु करण्यासाठी समस्त स्वामीभक्तांनी या स्वामी कार्यास सढळ हाताने मदत करावी ही नम्र विनंती…

अन्नदानाच्या माध्यामातून होत असलेल्या स्वामीकार्यात आपलेही योगदान असावे यासाठी परगांवाहून येणाऱ्या हजारो स्वामीभक्तांच्या महाप्रसादाची व त्यांच्या निवासाच्या व्यवस्थेकरिता आणि श्री स्वामी समर्थांचे पवित्र स्वामीकार्य अखंडीत व अविरतपणे स्वामी भक्तांनी अन्नदान व बांधकाम सेवेत मनापासून सहभागी व्हा.

|| श्री स्वामी समर्थ ||

अन्नछत्र

२९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले. या अन्नछत्राचे “श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट” असे नामकरण करण्यात आले…

हया अन्नछत्राचा विस्तार व्हायला लागला. अन्नदानासाठी परगांवच्या भक्तांच्या देणग्या यायला लागल्याने ट्रस्ट स्थापनाची आवश्यकता भासु लागली. त्यामुळे सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी आपले निकटवर्तीयसंबधीत व सहकारी असलेल्या स्वामीभक्तांना सभासद करून घेऊन पब्लिक ट्रस्ट (सार्वजनिकन्यास) ची नोंदणी केली.
अन्नछत्र हे दुपारी 12 ते 3 व रात्री 9 ते 11 या वेळेत सुरू असते. गर्दीच्या वेळेस किवां उत्सवाच्या दिवशी हे अन्नछत्र अहोरात्र सुरू असते. येथे आलेला भक्त विन्मुख होऊन जात नाही. हे या अन्नछत्राचे विशेष आहे. अन्नछत्रात रोज अंदाजे १० हजार तर गर्दीच्या विशेष दिवशी सुमारे १ लाख स्वामीभक्त महाप्रसाद घेतात. महाप्रसादाचा दररोजचा खर्च सरासरी २ लाख ते ३ लाख रूपये इतका आहे. सदरचा महाप्रसाद (मोफत पुर्ण भोजन) मोफत असल्याने येथे कसल्याच प्रकारचे मुल्य त्यासाठी आकरले जात नाही.

अन्नछत्राची नवीन इमारत

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ {Trust F-2279} अक्कलकोट या संस्थानने नव्याने महाप्रसादगृहाची भव्य व देखणी इमारत बांधकाम अंदाजित रक्कम ४५ कोटी रुपये खर्च …

खर्च अपेक्षित होणार असून हे बांधकाम लवकर पूर्ण करण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाआशिर्वाद आणि भक्तांचा स्वामीचा रुपात मिळणारा उदार आश्रय आणि अन्नदानाच्या कार्यात त्यागीवृतीने अहोरात्र परिश्रम करणाऱ्या सेवेकरयांचे योगदान यामुळेच अन्नछत्र मंडळाचे अल्पावधीतच वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
नियोजित महाप्रसादगृहाच्या बांधकामासाठी रु.५००००/- ते रु.१०००००/- पर्यंत देणगी देणारया देणगीदाराचे नाव ग्रेनाईटच्या बोर्डावर कोरण्यात येईल आणि सदर ग्रेनाईट बोर्ड बांधकाम झाल्यावर महाप्रसादगृहात लावण्यात येईल आणि रु. १००००१ किंवा त्यापेक्षा जास्त देणगी देणारया देणगीदाराचे नाव मार्बल संगमरवर प्लेटवर कोरण्यात येईल आणि सदर मार्बल बोर्ड बांधकाम झाल्यावर महाप्रसादगृहात लावण्यात येईल. महाप्रसादगृह एकावेळेस २००० भाविक महाप्रसाद घेतील इतक्या क्षमतेचे असणार आहे.
हि भव्य देखणी इमारत ४ माजली असणार आहे. तळ मजला हा प्रतीक्षा गृह असून वरील ३ हि माजले हे महाप्रस्द्गृहासाठी असणार आहे. ह्या इमारतीत देणगी काउंटर्स, कार्यालय, धान्य गोदाम, स्वयंपाकगृह, भांडी धुवण्यासाठी ची जागा, भाजी निवडण्यासाठी जागा तसेच पीठ गिरणी, कांडप मशीन, स्वच्छता गृह व लिफ्ट ची सोय इत्यादी असणार आहे. सदर ईमारत हि संपूर्णतः वातानुकुलीत असणार आहे.

मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांनी दि. १९/१०/२०२० रोजी सदिच्छा भेट देवून अन्नछत्राच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले

विनम्र आवाहन

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (Trust F-2279) अक्कलकोट या संस्थानने नव्याने महाप्रसादगृहाची भव्य व देखणी इमारत बांधकाम अंदाजित रक्कम ४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित होणार असून हे बांधकाम लवकर पूर्ण करण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे.
नियोजित महाप्रसादगृहाच्या बांधकामासाठी रु.५००००/- ते रु.१०००००/- पर्यंत देणगी देणारया देणगीदाराचे नाव ग्रेनाईटच्या बोर्डावर कोरण्यात येईल आणि सदर ग्रेनाईट बोर्ड बांधकाम झाल्यावर महाप्रसादगृहात लावण्यात येईल आणि रु. १००००१ किंवा त्यापेक्षा जास्त देणगी देणारया देणगीदाराचे नाव मार्बल संगमरवर प्लेटवर कोरण्यात येईल आणि सदर मार्बल बोर्ड बांधकाम झाल्यावर महाप्रसादगृहात लावण्यात येईल. महाप्रसादगृह एकावेळेस २००० भाविक महाप्रसाद घेतील इतक्या क्षमतेचे असणार आहे.
हि भव्य देखणी इमारत ४ माजली असणार आहे. तळ मजला हा प्रतीक्षा गृह असून वरील ३ हि माजले हे महाप्रस्द्गृहासाठी असणार आहे. ह्या इमारतीत देणगी काउंटर्स, कार्यालय, धान्य गोदाम, स्वयंपाकगृह, भांडी धुवण्यासाठी ची जागा, भाजी निवडण्यासाठी जागा तसेच पीठ गिरणी, कांडप मशीन, स्वच्छता गृह व लिफ्ट ची सोय इत्यादी असणार आहे. सदर ईमारत हि संपूर्णतः वातानुकुलीत असणार आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाआशिर्वाद आणि भक्तांचा स्वामीचा रुपात मिळणारा उदार आश्रय आणि अन्नदानाच्या कार्यात त्यागीवृतीने अहोरात्र परिश्रम करणाऱ्या सेवेकरयांचे योगदान यामुळेच अन्नछत्र मंडळाचे अल्पावधीतच वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी अन्नदानाच्या माध्यामातून सेवा रूजु करण्यासाठी समस्त स्वामीभक्तांनी या स्वामी कार्यास सढळ हाताने मदत करावी ही नम्र विनंती. अन्नदानाच्या माध्यामातून होत असलेल्या स्वामीकार्यात आपलेही योगदान असावे यासाठी परगांवाहून येणाऱ्या हजारो स्वामीभक्तांच्या महाप्रसादाची व त्यांच्या निवासाच्या व्यवस्थेकरिता आणि श्री स्वामी समर्थांचे पवित्र स्वामीकार्य अखंडीत व अविरतपणे स्वामी भक्तांनी अन्नदान व बांधकाम सेवेत मनापासून सहभागी व्हा. 

अन्नदान सेवेत सहभागी व्हा !

अक्कलकोट येथे वटवृक्ष स्वामी मंदिरा लगत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट (प. ट्र.न.एफ./२२७९, सोलापूर) तर्फे दि.२९-७-८८ च्या गुरुपोर्णिमेपासून परगावच्या स्वामी भक्तांना मोफत अन्नदान (मोफत पुर्ण भोजन-महाप्रसाद सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळेस) सेवाकार्यास प्रारंभ झाला आहे.स्वामी समर्थांच्या या दत्तनगरीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माधुकरी महाप्रसाद (अन्नदान) सेवेतअसंख्य भाविक यथाशक्ती अन्नदानास देणगी देऊन सहभागी होत आहेत.

एका दिवसाच्या नैवद्यासाठी देणगी रु.११००/- आणि देणगी रु.११०००/- कायम (चिरंतन) ठेव ठेवल्यासदेणगीदाराच्या इच्छेनुसार प्रतिवर्षी ठराविक तिथीस किवा तारखेस अन्नदान केले जाते. आणि सदर दिवशी महाप्रसादगृहा मध्ये फलकावर आजचा महाप्रसाद सदराखाली देणगीदारांचे नाव लिहले जाते.तसेच रु.५०१/- देणगी दिल्यास भक्तांस संकल्प व आरतीमध्ये सहभागी होता येते. त्याचप्रमाणे रु.५०००/-ची देणगी दिल्यास देणगीदाराचे इच्छेनुसार प्रतिवर्ष एक दिवस अन्नदानाचा संकल्प सोडला जाईल.या देण्यात येणाऱ्या देणग्यांची रितसर पावती मिळेल. सदर अन्नदानाच्या कार्यक्रमास देणगीदारासउपस्थित राहता येते आणि त्यांच्या देणगीप्रमाणे स्वामींना महानैवद्य, आरती, संकल्प व अन्नदान इ. कार्यक्रम पार पाडले जातात. समक्ष उपस्थित राहू न शकल्यास त्यांना पोस्टाने प्रसाद, अंगारा, विभुती,पाठविला जातो. समक्ष देणगी देणे न जमल्यास मनिऑर्डर, चेक, ड्राफ्टद्वारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट- एफ/२२७९), अक्कलकोट जि. सोलापूर- ४१३२१६ या पत्त्यावर देणगी पाठविता येत येईल. श्री स्वामीसमर्थ अन्नछत्र मंडळात चाललेल्या या स्वामी कार्यास जास्तीत जास्त भाविकांनी यथाशक्ती देणगी देऊन अन्नदान सेवेत सहभागी व्हावे.
श्रीगुरुपौर्णिमा, १९८८ रोजी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट-एफ /२२७९), अक्कलकोट ह्याधर्मादाय न्यासाची स्थापना झाली. शून्यातून निर्माण झालेल्या या न्यासाची केवळ २९ वर्षात प्रचंड वटवृक्षात रुपांतर झाले आहे. परगावचे स्वामीभक्त व शहरातील दानशूर व्यक्तींनी वस्तूरूपी, धान्यरुपी व देणगीरुपी भरघोस सहाय्य केले आहे. आज मितीस अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस १५ ते २० हजाराच्या वर परगावांचे स्वामीभक्त महाप्रसादाचा लाभ घेऊन तृप्त होतात, हे चाललेले स्वामीकार्य स्वामी भक्तांच्या देण्ग्यावरच चालते.

श्री जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले
संस्थापक अध्यक्ष
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट
फोन: ०२१८१-२२०४४४, २२१४४४,२२१५५५, २२११८० ,७४४८१२०४४४
यात्री निवास: २२२५५५ ,९०६७३००५५५ यात्रीभुवन:२२२५८७ , ९०६७६७०५८७ ,
फॅक्स : ०२१८१ – २२११८०, रुग्णवाहिका : ०२१८१- २२२७७७, अग्नीशमन : ०२१८१-२२१७७७
वेबसाईट : www.swamiannacchatra.org ई-मेल : contactus@swamiannacchatra.org
PAN : AAATS5556M
ऑनलाईन देणगीसाठी : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) अक्कलकोट,
बँकेचे नाव :स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा : अक्कलकोट शाखा क्र. : 0304
बचत खाते क्र : 11419854447, आयएफएससी कोड : SBIN0000304
(टिप – सदरहू देणगी ८० जी कलमान्वये आयकरातून सूट आहे.)