श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट


पर्यटन


पर्यटन विषयक

अक्कलकोट हे शहर महाराष्ट्रातील सोलापुर जिल्ह्यात येते. हे तालुक्याचे ठिकाण असुन महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर वसले आहे. अक्कलकोटला एस.टी. बसने व रेल्वेने येता येते. सोलापुर, नळदुर्ग, गुलबर्गा, गाणगापूर, अफजलपूर ह्या मार्गाने येता येते.श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा: उद्देश व माहिती

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट हया धर्मादाय संस्थानच्या वतीने दरवर्षी जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांच्या कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका पालखी परिक्रमा आयोजित केली आहे. यंदाचे हे 12 वे वर्ष असुन, गेली 11 वर्षे संपुर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा च्या काही भागात तसेच मध्य प्रदेश व गुजरात सिमेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी गावोगावी व शहरात नेण्यात येते. श्री स्वामी समर्थ महराजांच्या भक्तीचा प्रसार सर्वत्र व्हावा हा प्रमुख उद्देश असुन दुरवर परगावी असणारे स्वामीभक्त, अबाल वृध्द, स्त्रीया, विकलांग रूग्ण इ. ना. इच्छा असुनहि श्री स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे येता येत नाही. अशांकरिता या अन्नछत्राच्या मुळस्थानातील स्वामींच्या पालखीच्या माध्यमातुन श्री स्वामीचं त्यांना भेटल्याचा भाव हया स्वामी भक्तांना पालखी दर्शन झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. त्यांच्या गांवी पालखी गेल्यानंतर हया भक्तांना सहजासहजी स्वामीसेवा करता येते.