श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट

सेवा


परगावच्या स्वामीभक्तांसाठी निवासव्यवस्था

परगावच्या स्वामीभक्तांची महाप्रसादाची सोय झाली. परंतु हजारोंच्या संख्येने येणाऱ्या स्वामी भक्तांची निवासव्यवस्था नसल्याने त्यांना मनापासुन स्वामी सेवा रूजु करता येत नव्हती, त्यामुळे अन्नछत्र मंडळाने सुमारे १५ कोटींचा बांधकाम प्रकल्प हाती घेतला आणि सर्वप्रथम भाविकांच्या निवासासाठी यात्री निवास बांधण्याचे निश्चित झाले.


 • रू.३९०००/ खोली बांधकाम देणगीदार सदर योजना ही यात्री निवास १ हया भव्य वास्तुत असुन ही योजना अगदीच मर्यादीत असल्याने सदरची योजना पुर्ण झाली आहे.

  - हया इमारतीमध्ये ६६ खोल्या असुन त्या खोल्यापैकी एका खोलीकरिता रू.३९०००/- असा कमीत कमी निधी घेऊन सदर भक्तांचे नांव संबंधित खोलीस लावले आहे.


 • रू.५१०००/- खोली बांधकाम देणगीदार सदरची योजना पूर्ण झाली असुन यात्रीभुवन २ हि भव्य इमारत सुद्धा भक्तांच्या सेवेत कार्यरत आहे.
 • अन्नछत्रात यात्रेकरूंच्या निवासाची बुकींग व्यवस्था

  संस्थानच्या यात्रीनिवास १ आणि यात्रीभुवन २ हया यात्रेकरूंच्या निवासाच्या इमारतीतील निवासासाठी करण्यात येणारी अॅडव्हान्स बुकींग व्यवस्था ही सहज व सुलभ आहे. परगांवच्या दर्शन / प्रसादानिमित्त अक्कलकोट मुक्कामी अन्नछत्रात निवासाकरिता यावयाचे असेल तर ०२१८१/२२२५५५, ९०६७३००५५५ यात्री निवास १ आणि ०२१८१/२२२५८७, ९०६७६७०५८७ , ७४४८१२०४४४ हया फोन वर फोन करून अॅडव्हान्स बुकींग करता येते. अॅडव्हान्स बुकींगला कसल्याच प्रकाराचे देणगी शुल्क आकारले जात नाही. त्याचप्रमाणे अॅडव्हान्स बुकींग न करता एखादा भक्त अन्नछत्रात येऊन थेट बुकींग करिता सदर इमारतीत गेला तर त्यांना बुकींग होऊन सहज खोली मिळू शकते; कारण या दोन्ही इमारती मोठया असल्याने खोली मिळाली नाही असे कधीच होत नाही.
  श्री शमिविघ्नेश गणेश मंदिर व सभा मंडप

  गणेशमंदिर निवासी खोल्या व परिसरातील इतर बांधकामे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात सदर जागा घेतल्यानंतर हया जागेचे सपाटीकरण करतेवेळेस शमीवृक्ष हया जागेच्या मध्यावर आढळून आल्याने त्याठिकाणी १९९४ साली या झाडाखाली श्री गणेशाची स्थापना करून त्याचे छोटे मंदिर बांधण्यात आले. कालांतराने हया गणेशाची बऱ्याच भाविकांना प्रचिती येऊ लागल्याने नवसास पावणारा गणपती अशी सर्वत्र ख्याती झाल्याने हया गणेशाचे " शमिविघ्नेश गणेश " असे नामकरण करण्यात आले. दर्शनासाठी भक्तांची दररोज गर्दी वाढत चालल्याने सदर मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचे व त्यासमोर सुदंर असा ४२'×३०' आकाराचे सभामंडप बांधण्याचे निश्चीत झाले. तसेच या गणेश मंदिराचे पिछाडीस लगतच निवासासाठी १२'×१५' हया आकाराच्या मोठया अशा ८ खोल्या संडास बाथरूमसहित दोन मजल्यामध्ये बांधण्यात आल्या. सभा मंडपाचे बांधकाम करण्यात आले. या गणेश मंदिरा लगतच श्री हनुमानाचे छोटे मंदिर व त्यापुढे पत्र्याचे मोठे शेड उभारण्यात आले. या दोन्ही मंदिरामध्ये शिवस्माराकाची उभारणी करण्यात आली आहे.
  इतर बांधकामे

  प्रतिक्षागृह सदरचे बांधकाम हे २००१ या वर्षी करण्यात आले आहे. महाप्रसादासाठी स्वामीभक्तांची दिवसेंदिवस गर्दी वाढत चालल्याने त्यांना महाप्रसादासाठी व्यवस्थीत रांगेत सोडणे तसेच पंगत उठेपर्यंत अर्धा एकतास त्यांना ताटकळत उभे राहवे लागते हे सर्व लक्षात घेऊन संस्थानने यात्री निवास एक हया इमारतीलगतच कुंपण भिंतीस लागुन १००'×२०' हया आकाराचे प्रतिक्षा हॉल बांधले आहे. हया शेड मध्ये १ हजार स्वामीभक्त प्रतिक्षेत बसु शकतात. तेथुनच रांगेने भक्तांना महाप्रसादगॄहात सोडले जाते.