• अन्नछत्र

  २९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले. या अन्नछत्राचे “श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट” असे नामकरण करण्यात आले.ह्या महाप्रसादगृहात स्वंयपाकगृह कोठी खोली, ताट ग्लास वाटया विसळण्याची जागा, हातधुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, पीठगिरणी, शेंगाकुट, कणीकतिंबणे, मिरची तिखट करणे, देणगीकांऊटर इ. सोयी निर्माण करण्यात आल्या.

 • अन्नछत्र

  महाप्रसादाचे व्यवस्थित नियोजनबध्द आणि शिस्तबध्द कार्य चालण्यासाठी ४ व्यवस्थापक नेमण्यात आले आहेत. यांच्या देखरेखी खाली हे कार्य व्यवस्थित चालते. भक्तांची महाप्रसादासाठी पंगत बसल्यानंतर त्यांना ताट ठेवणे, पाणी देणे, ताट लावणे इ. कामे करण्यासाठी १०० च्या वर सेवेकरी वर्ग कार्यरत असतो. यांच्याकरवी महाप्रसाद वाढण्याचे काम नियोजन बध्द होत असते. स्वंयपाक गृहात ५० च्या वर महिला सेवेकरी पोळया लाटण्याचे काम मन लावुन करत असतात

 • अन्नछत्र

  श्री स्वामी समर्थाच्या पावनभुमीत अन्नदानाचे चाललेले पवित्र असे स्वामीकार्या बरोबर स्वामी समर्थांच्या असीम कॄपेने अन्नछत्र मंडळात श्री दत्त जयंती, गुरूप्रतिपदा(गाणगापुर यात्रा), श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव आणि गुरूपोर्णिमा (अन्नछत्र वर्धापन दिन) इ.उत्सव भव्य प्रमाणात साजरे होत असतात.

 • अन्नछत्र

  अक्कलकोट हे शहर महाराष्ट्रातील सोलापुर जिल्ह्यात येते. हे तालुक्याचे ठिकाण असुन महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर वसले आहे. अक्कलकोटला एस.टी. बसने व रेल्वेने येता येते. सोलापुर, नळदुर्ग, गुलबर्गा, गाणगापूर, अफजलपूर ह्या मार्गाने येता येते.

 • अन्नछत्र

  अन्न हे परब्रम्ह आहे ! अन्नदान सर्व श्रेष्ठ दान... असे म्हटले आहे. त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खुप मोठी आहे. अन्नाची गरज ही या भुतलावरील मानवासहीत सर्व प्राणीमाञांना आहे. अन्नग्रहणाने क्षुधा शमतेलअन्नामधे साक्षात र्इश्वराचा वास असतो, त्यामुळे हया महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तॄप्त होतो. एकप्रकारचे मानसिक समाधान मिळते.सध्या या अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस १५००० च्या वर परगांवचे स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात.ऑनलाईन बुकिंग निवास ऑनलाइन देणगी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाबद्दल माहिती

अक्कलकोटचे ऐतिहासिक महत्व असून हे पूर्वी संस्थान होते. येथे राजघराण्याची गादी असुन भोसले हे संस्थानिक आहेत. श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले, पहिले शहाजीराजे, मालोजीराजे, फत्तेसिंहराजे तिसरे व श्रीमंत विजयसिंहराजे भोसले असे पराक्रमी व कर्तबगार राजे होऊन गेले. अक्कलकोट शहराची ख्याती सबंध महाराष्ट्रभर आणि देशभर पसरली ती म्हणजे दत्तावतारी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचेमुळे. श्री स्वामी समर्थाचा हा अवतार श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे कारकीर्दीत झाला. श्रीमंत मालोजीराजे भोसले हे स्वामी भक्त होते. अक्कलकोट मधील २२ वर्षांच्या वास्तव्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक चमत्कार करून यांची महती सर्व महाराष्ट्रभर पसरली. श्री. स्वामी समर्थाच्या या पावननगरी मध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी उचलुन धरली व २९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले.


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाबद्दल माहिती