मुक्काम

स्वामीभक्तांसाठी निवासव्यवस्था

परगावच्या स्वामीभक्तांची महाप्रसादाची सोय झाली. परंतु हजारोंच्या संख्येने येणाऱ्या स्वामी भक्तांची निवासव्यवस्था नसल्याने त्यांना मनापासुन स्वामी सेवा रूजु करता येत नव्हती, त्यामुळे अन्नछत्र मंडळाने सुमारे १५ कोटींचा बांधकाम प्रकल्प हाती घेतला आणि सर्वप्रथम भाविकांच्या निवासासाठी यात्री निवास बांधण्याचे निश्चित झाले.

यात्री निवास १

ही इमारत मंदिरसदृश्य असुन भव्य आणि देखणी वास्तु आहे. ही वास्तु म्हणजे सोलापुर जिल्हयाच्या सौंदर्यात भर असे म्हटले तरी वावगे ठरू नये. ही इमारत ३ मजली असुन या इमारतीत मोठे १८ हॉल्स आणि 66 खोल्या आहेत. ही इमारत १५००० चौ.फुट जमिनीवर व्यापली आहे. या इमारतीत अंदाजे ५००० स्वामीभक्त आराम करतील अशी क्षमता व व्यवस्था येथे आहे. 

तसेच या इमारतीमध्ये जवळपास ७५ च्यावर सेवेकरी अहोराञ पाळयांमध्ये काम करीत असतात. या ठिकाणी लॉकर्सची सुविधा आहे. कार्यतत्पर सेवेकरी, स्वच्छता टापटीप, हवेशीरपणा, प्रसन्न व मोकळे वातावरण, सेवेकर्यांची विनम्र वागणुक, भरपुर पाणी, सुरक्षा व्यवस्था आणि वाहनतळ लगतच अन्नछञ व अगदी समोरच श्री. स्वामी समर्थांचे मंदिर तसेच नाममात्र देणगी शुल्क अशी या वास्तुची वैशिष्टये आहेत.

यात्री निवास २

ही इमारत यात्री निवास १ इमारती शेजारी असुन श्री शमिविघ्नेश गणेशमंदिरा समोर आहे. सद्या या इमारतीचे बांधकाम चालु असुन ही अद्यावत आणि आरामदायी व व्ही आय पी सुट ने परिपुर्ण असलेली इमारत आहे. सदर इमारतीत १०६ खोल्या असुन ही इमारत ३ मजली आहे. या इमारतीत १८ वातानुकूलीत खोल्या (ए सी खोल्या प्रत्येक मजल्यास ६) आहेत.

रूमचे वर्णन खालीलप्रमाणे

सदर खोल्या नाममात्र शुल्क आकारून भक्तांना दिले जाते.
बुकिंगसाठी संपर्क
यात्री निवास: ९०६७३००५५५,०२१८१ – २२२५५५ ,
यात्रीभुवन: ९०६७६७०५८७,०२१८१ – २२२५८७ , 
अधिक माहितीसाठी संपर्क
मुख्य कार्यालय – ०२१८१ – २२११८० 

श्री. शाम शिवराम मोरे (सचिव) –०९३७०४२७०४३