‘अमर लता’ ह्या कार्यक्रमाने श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव चौथे पुष्प संपन्न झाले

सत्यम..! शिवम ..! सुंदरम..!, यशोमती मैया से बोले नंदलाला..!, एक प्यार का नगमा है..!, क्या यही प्यार है..! ओ जब याद आए बहुत याद आये..!, अशा एक ना अनेक मराठी-हिंदी भाव-भक्ति व चित्रपट गीते ‘शिवरंजनी’ सोलापूर प्रस्तुत ‘अमर लता’ सादरकर्ते- निर्मिता समीर रणदिवे, दिग्दर्शक – उन्मेश शहाणे, संकल्पना – शाईवाले व मोहोळकर, निवेदन – माधव देशपांडे यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्सपुर्त प्रतिसाद मिळाला.

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, सोमवार सायंकाळी ७ वा. ‘अमर लता’ ह्या कार्यक्रमाने चौथे पुष्प संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन अँड.विजय हर्डीकर, एजाज मुतवल्ली, राजीव माने, बाळासाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास कॉंग्रेसचे केंद्रीय प्रदेश निरीक्षक आशिष दुवा, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे, कॉंग्रेस कमिटीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील व प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष सुधीर भाऊ लांडे, जनसेवा संघटक अभिराज शिंदे हे देखील उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांसह कलाकारांचा न्यासाच्या वतीने प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, क्रांती वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, कोमल मचाले व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, विश्वस्त संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, प्रथमेश इंगळे, नंदकुमार हंचाटे, गोविंदराव भंडारे, प्रा.नागनाथ जेऊरे, अमिन मुजावर, सत्तार शेख, स्वामीराव मोरे, योगेश पवार, रोहित खोबरे, श्रीकांत मलवे, अतिश पवार, राजु नवले, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाटगे, गोटू माने, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, अरविंद शिंदे, प्रथमेश पवार, धनंजय गडदे, अप्पू कलबुर्गी, सौरभ मोरे, वैभव मोरे, राहुल इंडे, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, महादेव अनगले, सनी सोनटक्के व राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसन्न बिराजदार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, गोविंदराव शिंदे, आकाश शिंदे, राहुल बकरे, मुबारक कोरबू, विक्रांत घोडसे, फहीम पिरजादे, सुमित कल्याणी, स्वामिनाथ गुरव, अशोक किणीकर, धानप्पा उमदी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था अराद्य इलेक्ट्रिकल यांनी केले.

गुणीजन गौरव :
यामध्ये विशेषगौरव पुरस्कार माजी उप नगराध्यक्ष यशवंत तात्या धोंगडे व दक्षिण पोलिस ठाण्याचे पो.हे.कॉ. एजाज मुल्ला, दुय्यम उपनिबंदक डी.डी.चाटे, नागणसूर जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे शिक्षक शरणप्पा फुलारी, शहाजी प्रशालेचे शिक्षक राजेश पडवळकर व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्या. अक्कलकोटचे वरिष्ठ तंत्रज्ञ बिलाल चाऊस यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ८ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.


मंगळावर दि.२७ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘हास्य संजे’ कन्नड विनोदी कार्यक्रम सादरकर्ते – कॉमिडी किंग गंगावती प्रणेश, नरसिंह जोशी आणि बसवराज महामनी कर्नाटक यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.