करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय (मामा) शिंदे यांची सदिच्छा भेट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे एक धार्मिक प्रेरणा देणारे न्यास असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांनी महाप्रसाद सेवे बरोबरच सामाजिक सेवेला प्राधान्य दिल्याचे गौरव उद्गार करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय (मामा) शिंदे यांनी काढले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता प्रमुख कार्यकारी विश्वेस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी (वकील काका), मल्लिकार्जुन पाटील, सुरेश हसापुरे, अश्पाक बळोरगी, बाळासाहेब मोरे, शिवराज स्वामी, रामचंद्र समाणे, मैनुद्दीन कोरबू, सरफराज शेख, संजय सूर्यवंशी, राजेंद्र मोरे, अवधूत सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी, विश्वनाथ हडलगी हे उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, सनी सोनटक्के, अप्पा हंचाटे, पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, सतिश महिंद्रकर, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, अभियंता अमित थोरात, बाळासाहेब घाडगे, किरण पाटील, मारुती बावडे, रुद्रय्या स्वामी, गोरखनाथ माळी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, नंदकुमार स्वामी, महेश स्वामी, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.