कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे वाटप

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व संकल्पनेतून मकर संक्रांतीचे औचित्य साधून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम न्यासाच्या कार्यातील एक महत्वाचे पाऊल असून, अशा विधायक उपक्रमाबद्दल सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे.


दरम्यान सदरचे वाटप प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या उपस्थितीत स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, न्यासाचे सचिव शामराव मोरे, माजी उप नगराध्यक्ष दिलीप सिद्धे, माजी पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब मोरे, माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, शिवराज स्वामी, मैनुद्दीन कोरबू व या उपक्रमास सहकार्य केलेले पै.महेश कुलकर्णी, महाराष्ट्र केसरी पै.मौला शेख बादोला, सरफराज शेख, सदस्य मनोज निकम, अरविंद शिंदे, अतिश पवार व मोहोळच्या माजी नगरसेविका सीमाताई पाटील, रोहित खोबरे, सौरभ मोरे, हे उपस्थित होते.


गेली ३६ वर्षे अविरतपणे अन्नदानाचे स्वामीकार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे न्यास संपूर्ण देशात ख्यातनाम आहे. संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या कार्यास झळाळी प्राप्त झाली आहे. अन्नछत्र मंडळात दररोज लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. याबरोबरच “समर्थ महाप्रसाद” सेवे बरोबरच आता तालुक्यातील गोरगरीब कुस्तीगीरांसाठी न्यासाकडून प्रसाद रुपी खुराकाचे वाटप प्रती महिन्यास करण्यात येणार आहे. या कीट मध्ये कुस्तीगीरांना आवश्यक तूप, बदाम, खारीक, बडीसोप, खसखस, इलायीची, धने आदि पदार्थ कुस्तीगरांसाठी श्रींचा प्रसाद रुपी खुराका असणार आहे.


तालुक्यातील कुस्तीगीर हे सरावाकरिता कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदि ठिकाणी कुस्तीचा सराव करीत आहे. मात्र त्यांची गरज ओळखून तालुक्याच्या चांद्या पासून बांध्यापर्यंतच्या कुस्तीगरांचा एका विशेष टीमच्या माद्यमातून सर्वे करून तालुक्यातील ४६ पैलवानांची निवड करण्यात आली. याकामी पै.महेश कुलकर्णी, महाराष्ट्र केसरी पै.मौला शेख बादोला, सरफराज शेख, अतिश पवार यांचे सहकार्य लाभले. सदरचे कीट कुस्तीगरांना त्यांचा सराव सुरु असे तो पर्यंत देण्यात येणार आहे. लाभार्थी कुस्तीगरांसाठी न्यासाकडून रजिस्टर नोंदणीच्या माध्यमातून प्रती महिना कीट दिले जाणार आहे.


याप्रसंगी बोलताना पै.महेश कुलकर्णी म्हणाले, तालुक्यात कुस्ती खेळणारे मल्लांची संख्या मोठी आहे. मात्र सराव आहे खुराक नांही. अशा अवस्थेमध्ये मल्ल असताना, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व संकल्पनेतून मकर संक्रांतीचे औचित्य साधून तालुक्यातील गोरगरीब कुस्तीगीरांसाठी न्यासाकडून प्रसाद रुपी खुराकाचे वाटप करण्यात आली ही बाब आम्हा कुस्तीगरांसाठी दिलासात्म्क व अभिमानास्पद असून निश्चितच..! स्वामी रुपी प्रसादाने मल्ल घडून श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव कोल्हापूर प्रमाणे राष्ट्रीय स्थारापर्यंत नांव पोहोचणार असल्याचे मनोगत पै.महेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.


माजी उपनगराध्यक्ष दिलीप सिद्धे बोलताना म्हणाले की, अक्कलकोट शहरातील गरजू, वृद्ध, दिव्यांग, निराधार लोक आहेत, ज्यांची रोजच्या जेवणाची भ्रांत आहे, ही माहिती जेव्हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांना समजली, तेव्हा त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून दोन्ही वेळचे जेवण डब्यातून पुरविण्याचा निर्णय घेतले, त्याप्रमाणे “समर्थ महाप्रसाद” सेवेचा शुभारंभ दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आले होते. आज मकर संक्रांतीचे औचित्य साधून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे वाटप स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आले. पैलवानासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असून, न्यासाने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करतो.


माजी पं.स.सदस्य बाळासाहेब मोरे म्हणाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला असून, राज्यातला हा पहिलाच उपक्रम असून, कुस्तीगरांसाठी एक महत्वाचे पाऊल मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व संकल्पनेतून उभ्या तालुक्यातील गोरगरीब, गरजू पैलवानाकरिता हा उपक्रम संजीविनी असल्याचे मोरे यांनी व्यक्त केले.