श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) हे अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासाची उंची वाढविणारे न्यास असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांच्या उत्कृष्ठ व्यवस्थापन व नियोजनामुळेच हे सर्व शक्य होत असल्याचे मनोगत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री ना.रावसाहेब दानवे-पाटील यांच्या सुविद्य पत्नी निर्मलाताई रावसाहेब दानवे-पाटील यांनी व्यक्त केल्या.
त्या तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे व सचिव शामराव मोरे यांच्या उपस्थितीत विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
त्यांच्या समवेत त्यांच्या कन्या संजनाताई जाधव, नातू उषाताई आकात, शिवम पाटील, आशाताई माळी, अलकाताई गाडेकर, शोभाताई मातकर, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री ना.रावसाहेब दानवे-पाटील यांचे स्वीयसाहय्यक आत्माराम गव्हाणे, श्री क्षेत्र अक्कलकोटचे समर्थ नगरचे नाजी सरपंच प्रदीप पाटील, शिवशंकर स्वामी, सागर डिग्गे, समर्थ अल्लोळी, सागर याळवार हे उपस्थित होते.
यावेळी न्यासाचे विश्वस्त संतोष भोसले, बाळासाहेब घाडगे, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, अप्पा हंचाटे, शहाजी यादव, नामा भोसले, धानप्पा उमदी, निखील पाटील, प्रवीण घाडगे, स्वप्नील माणिकशेट्टी, विशाल घाडगे, अभियंता अमित थोरात, दत्ता माने, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.