जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सुविद्य पत्नी वर्षाताई विक्रमसिंह सावंत यांची सदिच्छा भेट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वसस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भक्तांना महाप्रसादा बरोबरच मंडळाच्या परिसरात शिवस्मारक, शिवसृष्टी, सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासह नाविन्यपूर्ण योजना आखण्यात आल्याचे मनोगत जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सुविद्य पत्नी वर्षाताई विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केल्या.

त्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी इस्लामपूरच्या नगरसेविका सुप्रिया पाटील ह्या उपस्थित होत्या.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, अ‍ॅड.संतोष खोबरे, विश्वस्त संतोष भोसले, एस.के.स्वामी, निखिल पाटील, प्रविण घाटगे, सिध्दाराम कल्याणी, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, नामा भोसले, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.