श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वसस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामीभक्तांना मिळणारी आध्यात्मिक सेवा ही वाख्यान्याजोगी असल्याचे मनोगत ठाणे घोडबंदर रोड, कासार कडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अक्कलकोट तालुक्याचे सुपुत्र राजेश बाबशेट्टी (शिरवळ) यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शरणबसप्पा उर्फ अप्पू बिराजदार, दत्ताअण्णा बाबशेट्टी, राजू निंबाळे, कृष्णा सोनवणे हे उपस्थित होते.
यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, नामा भोसले, धानप्पा उमदी, अभियंता अमित थोरात, दत्ता माने, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, निखील पाटील यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.