तेलंगणा राज्याचे माजी लोकायुक्त एम.शिवरत्न यांची सदिच्छा भेट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांकरिता सुरू असलेल्या महाप्रसाद सेवेची ख्याती आंध्रप्रदेश – तेलंगणा या दोन्ही राज्यात वाढली असल्याचे मनोगत तेलंगणा राज्याचे माजी लोकायुक्त एम.शिवरत्न यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटूंब आले असता न्यासाचे न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंडळाचे सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, पुरोहित अप्पू पुजारी, बाळासाहेब पोळ, सतिश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, अतिश पवार, प्रवीण घाडगे, अभियंता अमित थोरात, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर. देवराज हंजगे, कल्याण देशमुख, संभाजीराव पवार, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते