दक्षिण मुंबईचे नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांची सदिच्छा भेट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाचा वृक्ष बहरत असल्याचे मनोगत दक्षिण मुंबईचे नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समावेत खासदार अरविंद सावंत यांच्या धर्मपत्नी अमया सावंत, सोलापूर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अमर पाटील, अजय दासरी, संतोष पाटील, सुनील कटारे, संतोष केंगनाळकर, प्रिया बसवंती, सुरेखा ढेपे, आनंदराव बुक्कानवरे, धर्मराज बगले, मामूद पठाण, दत्ता माने, स्विय सहायक करण डोंगरे, सुरक्षा रक्षक सुनील करपे हे उपस्थित होते.