भक्ती, शक्ती, धर्म-संस्कार प्रबोधन या त्रिवेणी संगमात लाख भक्तजनांना आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनभुती दिली

राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांनी भक्ती, शक्ती, धर्म-संस्कार प्रबोधन या त्रिवेणी संगमात लाख भक्तजनांना आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनभुती दिली. सध्याच्या विविध घडामोडीवर वृत्ती, वल्ली व कृती बाबत सडेतोड व परखड विचार व्यक्त केले. त्यांच्या कीर्तन कार्यक्रमास हजारो श्रोत्यांच्या गर्दीने संपूर्ण परिसर व्यापुन गेलेला होता. प्रचंड गर्दीमुळे न्यासाचा परिसरात ठिकठिकाणी स्क्रीनद्वारे प्रक्षेपण करण्यात आले होते.

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून बुधवार सायंकाळी ७ वाजता ‘किर्तन’ राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांच्या कार्यक्रमाने ६ वे पुष्प संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर व त्यांची टीम, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज, व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.

श्रीक्षेत्र अक्कलकोट हे गुरु पीठ आहे. या गुरु पिठात अन्नछत्राच्या माध्यमातून न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखील व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले महाप्रसाद या कार्याबरोबरच अन्य उपक्रमाचे कार्याचे कौतुक ह.भ.प. निवृत्त महाराजानी केले.

राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्त महाराजानी संत तुकाराम, एकनाथ, निवृत्ती महाराज, ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपान यांच्या अभंगाचा दाखला देत मन मुराद, उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात सद्य स्थितीवर त्यांनी परखडपणे समाज प्रबोधन केले.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, संगीता भोसले व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, राजाभाऊ निकम, मनोज निकम, वैभव नवले, राजेंद्र हजारे, दिलीप सिद्धे, चौडप्पा घोसले, शिवराज स्वामी, अविनाश मडीखांबे, उत्तम गायकवाड, गोपी पाटील, अभिजित लोके, बालाजी कटारे, प्रा.शरणप्पा अचलेर, दिनेश पाटील, सिध्दाराम शटगर, सुधाकर पाटील, महांतेश समाणे, महेश यादव, राजाभाऊ पैकेकर, शितल जाधव, सनी सोनटक्के, सोपनराव गोंडाळ, प्रकाश पडवळकर, प्रथमेश इंगळे, स्वामीराव मोरे, योगेश पवार, रोहित खोबरे, श्रीकांत मलवे, अतिश पवार, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाटगे, गोटू माने, विराज माणिकशेट्टी, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, अरविंद शिंदे, प्रथमेश पवार, सौरभ मोरे, राहुल इंडे, महादेव अनगले व राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसन्न बिराजदार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, सुमित कल्याणी, स्वामिनाथ गुरव यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.


गुरुवार दि.२९ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘व्याख्यान’ विषय – सेवाभाव-अन्नदान व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर ख्यातनाम व्याख्याते – नितीन बानुगडे-पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.