‘भावभक्ती गीतांजली’ या कार्यक्रमात अक्कलकोट शहरातील हजारो श्रोते मंत्रमुग्ध

लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते सौ. प्रतिभा थोरात व सहकलाकार पुणे यांचा ‘भावभक्ती गीतांजली’ या कार्यक्रमात अक्कलकोट शहरातील हजारो श्रोत्यांनी त्यांच्या गायन कलेने मंत्रमुग्ध होऊन विशेष आनंद घेतला. यास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, शनिवार सायंकाळी ७ वा. ‘भावभक्ती गीतांजली’ लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते सौ. प्रतिभा थोरात व सहकलाकार पुणे यांचा कार्यक्रमाचे दुसरे पुष्प संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन भूमिअभिलेखच्या उपअधिक्षक संतोष बिराजदार, उद्योजक लाला राठोड, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, अँड.संतोष खोबरे व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते सौ. प्रतिभा थोरात आणि सहकलाकार जब्बार मुर्षद, धनंजय आंबेकर, अमीर हुंडेकरी, सौ.सायली साठे, पूनम लांडे, स्नेहा कसबे, उर्मिला विजापुरे, डॉ.विनय थोरात, संदीप उबाळे, अक्षय म्हपराळकर यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.

रसिकप्रेक्षकांशी आपल्या सुमधूर स्वरात संवाद साधत गायक सौ. प्रतिभा थोरात यांनी ओंकार प्रधान रूप गणेशाचे.. ब्रह्म विष्णू आणि महेश्वर.. श्री गुरुदेव दत्त प्रभात गीत .., स्वामी समर्थ माझी आई..!, विठ्ठल नामाचा टाहो..! कानडा राजा पंढरीचा..! पाटाचा पाणी..! माझे गाणे..! अशा एक ना अनेक आपल्या गीतांनी सौ. प्रतिभा थोरात यांनी रसिकांची विशेष वाहवा मिळवली. या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, अक्षता खोबरे, कोमल खोबरे, जयश्री मगर, स्वाती निकम, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, क्रांती वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, कोमल मचाले, संपदा श्रीमान व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, राजेंद्र लिंबीतोटे, एबीपी माझाचे कॅमेरामन आयुब शेख, प्रा. शरणप्पा आचलेर, योगेश पवार, अतिश पवार, प्रथमेश इंगळे, राजु नवले, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अमित थोरात, शिवराज स्वामी, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, प्रा.प्रकाश सुरवसे, अशोक मलगोंडा, प्रथमेश पवार, सचिन स्वामी, धनंजय गडदे, अप्पू कलबुर्गी, श्रीकांत मलवे, विजय इंगळे, पिंटू दोडमनी, सौरभ मोरे, वैभव मोरे, श्रीशैल कुंभार, राहुल इंडे, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, विलास राठोड, मनोज जगताप यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था अराद्य इलेक्ट्रिकल यांनी केले.

गुणीजन गौरव :
यामध्ये विशेष गौरव पुरस्कार निवृत्त शिक्षक महमद हनिफ अब्बासअली उर्फ चाचा बिराजदार व स्टेट बँक ऑफ इंडिया अक्कलकोट शाखेचे व्यवस्थापक विकास खडतर, एबीपी माझाचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी आफताब शेख, ए.पी.आय इंद्रजित वर्धन, शिक्षिका श्रीमती रिंकू अनंतराव जाधवर यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.


रविवार दि.२५ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘स्वर आर्या’ एक भाव मैफिल, सादरकर्ते- आर्या आंबेकर आणि सहकारी मुंबई यांचा कार्यक्रम होणार आहे.