मराठी, हिंदी व कन्नड भावगीते व भक्तीगीतांनी ख्यातनाम गायिका आर्या आंबेकर यांच्या ‘स्वर आर्या’ एक भाव मैफिल या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते भारावले

गणराया..!, नरसोबाच्या वाडीला जाईन..!, देवाचिया दारी..! तुंगा तिरदी निंत यतवान्यारे, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..! विठ्ठला तू वेडा कुंभार..! अशा एक ना अनेक मराठी, हिंदी व कन्नड भावगीते व भक्तीगीतांनी ख्यातनाम गायिका आर्या आंबेकर यांच्या ‘स्वर आर्या’ एक भाव मैफिल या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते भारावले होते.

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, रविवार सायंकाळी ७ वा. ‘स्वर आर्या’ एक भाव मैफिल, सादरकर्ते – आर्या आंबेकर व सहकलाकार पुणे ह्या कार्यक्रमाने तिसरे पुष्प संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मराठी अभिनेता अक्षय मुदावाडकर, निलकंठ गुरुजी, दुधनी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, डॉ.आसावरी पेडगावकर, प्रिया बसवंती, डॉ.प्रसाद प्रधान, डॉ.आर.व्ही.पाटील, राजशेखर तथा अप्पी उमराणीकर, भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, प्राची आंधळकर, योगेश अहंकारी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय हे देखील उपस्थित होते.

याप्रसंगी लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते – आर्या आंबेकर आणि सहकलाकार यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. न्यासाचे आर्किटेक योगेश अहंकारी यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आला.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, अक्षता खोबरे, कोमल खोबरे, जयश्री मगर, स्वाती निकम, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, क्रांती वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, कोमल मचाले, संपदा श्रीमान व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, राजेंद्र लिंबीतोटे, स्वामीराव मोरे, योगेश पवार, रोहित खोबरे, प्रा. शरणप्पा आचलेर, अतिश पवार, राजु नवले, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाटगे, गोटू माने, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, सायबण्णा जाधव, महेश मेत्री, बसवराज धनशेट्टी, राजकुमार गोब्बुर, राहुल गोविंदे, अरविंद शिंदे, प्रथमेश पवार, धनंजय गडदे, अप्पू कलबुर्गी, डॉ.विपुल शहा, प्रीतेश किलजे, विशाल कलबुर्गी, लाला सोमवंशी, पिंटू मचाले, वासू कडबगावकर, सिध्देश्वर मोरे, पप्पू गडदे, मनोज हिंगोले, रामचंद्र समाणे, सौरभ मोरे, वैभव मोरे, राहुल इंडे, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, महादेव अनगले, सनी सोनटक्के व राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसन्न बिराजदार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, गोविंदराव शिंदे, आकाश शिंदे, राहुल बकरे, मुबारक कोरबू, विक्रांत घोडसे, फहीम पिरजादे, संभाजीराव लोंढे, सुधाकर काळे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था अराद्य इलेक्ट्रिकल यांनी केले.

गुणीजन गौरव :
उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत पुजारी, डॉ.प्रदीप घिवारे, पोस्टल असिस्टंट देविदास पल्लेवाड यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.


सोमवार दि.२६ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘शिवरंजनी’ सोलापूर प्रस्तुत ‘अमर लता’ मराठी-हिंदी भाव-भक्तिगीते सादरकर्ते –निर्मिता- समीर रणदिवे, दिग्दर्शक – उन्मेश शहाणे, संकल्पना – शाईवाले व मोहोळकर, निवेदन – माधव देशपांडे यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.