श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महाप्रसादाची सेवा व दूरदृष्टीचे नेतृत्व असल्यानेच एका छताखाली स्वामी भक्तांना सोयी सुविधा देणारे राज्यातील एकमेव न्यास असल्याचे मनोगत माजी उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत बावधनकर, मुंबई यांनी व्यक्त केले.
ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे पुरोहित संजय कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
त्यांच्या समवेत मुंबईचे माजी एसीपी संदीप सरवणकर, दक्षिण मुंबई कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुनील नरसाळे, उपविभागीय पोलिस कार्यालयातील गोपनीय विभागाचे धनराज शिंदे, अश्फाक मियावाले, माजी एएसआय सत्तारभाई शेख हे उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळू पोळ, नामा भोसले, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.