‘रंग विनोदाचे, रंग सुरांचे’ सादरकर्ते – श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, मेघना एरंडे व गायक- स्वप्नील गोडबोले, योगिता गोडबोले आणि सहकारी मुंबई ह्या कार्यक्रमाने ८ वे पुष्प संपन्न झाले.

महाराष्ट्राचा प्रसिद्ध हास्य कलाकार भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके यांचा चला हवा येऊ द्या फेम ‘रंग विनोदाचे, रंग सुरांचे’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सामाजिक, राजकीय चालू घडामोडीवर विनोदातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याबरोबरच विविध गाण्याने रसिकातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, सायंकाळी ७ वा. चला हवा येऊ द्या फेम ‘रंग विनोदाचे, रंग सुरांचे’ सादरकर्ते – श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, मेघना एरंडे व गायक- स्वप्नील गोडबोले, योगिता गोडबोले आणि सहकारी मुंबई ह्या कार्यक्रमाने ८ वे पुष्प संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, सोलापूरचे धर्मादाय उपायुक्त सुनिता कंकणवाडी, सोलापूर जि.प. मुख्यकार्यकारी धिकारी दिलीप स्वामी, सोलापूरचे जेष्ठ विधिज्ञ अँड. नितीन हबीब, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, संदीप फुगे-पाटील, अकलूज येथील सहारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचे कार्यकारी अध्यक्षा डॉ. श्रद्धा जंज्वाळ, अभियंता राजेश निलवाणी, कॉंग्रेस शहर अध्यक्ष रईस टीनवाला, भारतीय स्टेट बँकचे क्षेत्रीय प्रबंधक निशांतकुमार जयस्वाल, नगर रचना विभागाचे नारायणराव जोशी, सुनील देशपांडे व श्रीमती मल्लम्मा पसारे, समीर लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अनुया फुगे-पाटील, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, क्रांती वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, सखी मंचचे सोनल जाजू, सुवर्णा साखरे, अनिता पाटील, माधवी धर्मसाले, उषा छत्रे, आशा भगरे, अश्विनी बोराळकर, डॉ. दीपमाला आडवितोटे, रोहिणी फुलारी, मिनल तोरस्कर, प्रियांका किरनळ्ळी, व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, विश्वस्त संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, उत्तम गायकवाड, दिलीप सिद्धे, अप्पासाहेब पाटील, प्रथमेश इंगळे, स्वामीराव मोरे, योगेश पवार, रोहित खोबरे, श्रीकांत मलवे, अतिश पवार, राजु नवले, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाटगे, गोटू माने, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, अरविंद शिंदे, प्रथमेश पवार, धनंजय गडदे, अप्पू कलबुर्गी, सौरभ मोरे, वैभव मोरे, राहुल इंडे, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, महादेव अनगले, सनी सोनटक्के व राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसन्न बिराजदार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, गोविंदराव शिंदे, आकाश शिंदे, धानप्पा उमदी, दीपक जरीपटके, अशोक स्थावरमठ, सुरेश रूगे, प्रकश घिवारे, सिध्दाराम भंडारकवटे, राहुल माने, मनोज इंगोले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था अराद्य इलेक्ट्रिकल यांनी केले.

गुणीजन गौरव :
यामध्ये विशेषगौरव पुरस्कार कोल्हापूरचे सुहास पाटील, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे व सिध्दाराम-शंकर प्रतिष्ठानचे प्रा. धनराज भुजबळ, पत्रकार रविकांत धनशेट्टी, ग्रामीण रुग्णालयाचे सौ. सुमन साळुंखे, गौडगांवचे जगद्गुरू पंचाचार्य प्रशालेचे सहशिक्षक लाडप्पा शिंदे, प्रसिद्ध व्यापारी सिध्दाराम टाके व सखी ग्रुप, अक्कलकोट यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.


शनिवार दि. १ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत स्वामिनी प्रस्तुत ‘हिटस् ऑफ कुमार शानु’ सादरकर्ते –संदीप पाटील आणि सहकलाकार पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे.