श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाची महाप्रसाद सेवा हे अमृत असून जीवन सार्थ होत असल्याचे मनोगत राज्याचे आरोग्यमंत्री ना.तानाजीराव सावंत यांचे बंधू व शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वरस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
त्यांच्या समावेत शिंदे गटाचे शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख मनिष काळजे, तालुकाप्रमुख संजय देशमुख, युवसेना जिल्हाप्रमुख सागर शितोळे, सोशल मिडिया जिल्हाप्रमुख आशिष जट्टीखोर, आकाश इंगळे, नागनाथ मुंडे हे उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सतिश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, गोविंदराव शिंदे, अतिश पवार, अभियंता अमित थोरात, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, निखील पाटील, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.