राष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक महेश काळे यांची सदिच्छा भेट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून सुरू असलेल्या भक्तप्रिय कार्यामुळे अन्नछत्र मंडळाचे नांव सर्वत्र पोहोचत असल्याचे मनोगत राष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक महेश काळे, मुंबई यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, पुरोहित संजय कुलकर्णी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, देवराज हंजगे, शरद भोसले, चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते