राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत श्री स्वामींच्या कृपेने उत्तरोत्तर अवशकतेनुसार या कार्याची उत्तम प्रगती व्हावी हि हार्दिक शुभकामना व सर्व विश्वस्त व सेवाभावी कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन असे गौरवास्पद अभिप्राय दिले

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली १९८८ पासून निखळ सेवा भावातून सुरु असलेले अन्नछत्र पाहून आनंद झाला. श्री स्वामींच्या कृपेने उत्तरोत्तर अवशकतेनुसार या कार्याची उत्तम प्रगती व्हावी हि हार्दिक शुभकामना व सर्व विश्वस्त व सेवाभावी कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन असे गौरवास्पद अभिप्राय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी दिले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सोमवारी आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक यशवर्धन वाळिंबे, जिल्हा कार्यवाहक ऋषिकेश कुलकर्णी, तालुका कार्यवाहक चेतन जाधव, सुशांत पांडकर, मंगेश बडवे, रवी जोशी, संतोष वगाले, गंगाधर गवसाने हे उपस्थित होते. दरम्यान विधिवत, मंत्रोपचाराने श्रींचे पूजन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी अमोलराजे भोसले यांनी न्यासाच्या धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदि क्षेत्रातील कामगिरीची माहिती देऊन, यंदाच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सव न्यासाचा ३७ वा वर्धापन दिन आणि धर्मसकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम २०२४ वर्ष २५वे रौप्य महोत्सव या बाबत तयार करण्यात आलेली संस्नेह निमंत्रण पत्रिका व पत्र देण्यात आले.

चौकट – शुभेच्छा – कौतुक व आस्थेने चौकशी – श्री स्वामीसमर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी उभा केलेल्या न्यासाचे वटवृक्षात रुपांतर होत असून या मध्ये जन्मेजयराजे भोसले यांचे मोलाचे योगदान आहे, या महान कार्यास शुभेच्छा व्यक्त करून डॉ मोहन भागवत यांनी जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रकृती स्वास्था बद्दल आस्थेने चौकशी केली.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे काका, विश्वस्त संतोष भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, शहाजीबापू यादव, मल्लिकार्जुन बिराजदार,आतिश पवार, निखील पाटील, गोटू माने, योगेश कटारे, बलभीम पवार, बाळासाहेब पोळ, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, एस.के. स्वामी, लक्ष्मण बिराजदार, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, श्रीनिवास गवंडी, संभाजी पवार, अनिल बिराजदार, बसवराज क्यार, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विठ्ठल रेड्डी, विश्वनाथ कलशेट्टी, खंडेराय होटकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.