श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विजय उर्फ अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार अक्कलकोट यांच्यावतीने श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी वळसंग टोल नाका येथे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी नगरसेवक चेतन नरोटे, राजेंद्र हजारे, शैलेस पिसे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अविनाश मडिखांबे, नन्हु कोरबु, रमेश भोसले, श्रीशैल दुधगी, लक्ष्मण शितोळे, शशी शिंदे, संजय गायकवाड, यासीन कुरेशी आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, भाऊ कापसे, खजिनदार लाला राठोड, संतोष भोसले, रोहित खोबरे, दिनेश जाधव, विशाल भांगे, सत्यजित कापसे, कलप्पा स्वामी, बापू शेळके, रणवीर कोल्हे, पिटू सोनटक्के, निखिल पाटील, राजाभाऊ नवले, सागर गोंडाळ, कल्याणी छकडे, लक्ष्मण विभुते, निलेश जाधव, सिद्धेश्वर मोरे, पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, संदीप सुरवसे, गोविंद शिंदे, मुन्ना कोल्हे, नामा भोसले, बाळासाहेब पोळ, राहुल इंडे, सनी सोनटक्के, रोहित निंबाळकर, प्रविण घाटगे, राजु पवार, पिटू साठे, वैभव मोरे, प्रथमेश पवार, संदीप सुरवसे, दिलीप कदम, गोरखनाथ माळी, आतिष पवार, विनोद सुरपूरे, विराज माणिकशेट्टी, दिनेश जाधव, पंडित हिरेमठ, तुकाराम माने, श्रीशैल कुंभार, धानप्पा उमदी, यांच्यासह न्यासाचे सेवेकरी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रा.महादेव होटकर यांनी केले.