श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्रीदत्त जयंती उत्सव सोहळा बुधवारी सायंकाळी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला

अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्रीदत्त जयंती उत्सव सोहळा बुधवारी सायंकाळी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

श्री दत्तमंदिर नव्याने साकारण्यात आलेले असून या मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी सजविण्यात आलेले आहे. यंदा पु.ना.गाडगीळ या सराफ पेढीने तयार केलेल्या लक्षवेधी चांदीच्या पाळण्याला देखील गुलाबाच्या फुलाने सुशोभित करण्यात आले होते.

दरम्यान न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आला. दुपारी ४.३० वा. श्री वागदरी महिला भजनी मंडळाचे भजन सायं. ५.५० मि.नामस्मरण, सायं. ६ वा. श्री दत्तजन्म व गुलाल, पाळणा हा कार्यक्रम न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

संकल्प व नैवेद्य आरती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व अर्पिताराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. भजनी मंडळाचा सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी सुंठवडा प्रसाद व मसाला दूध वाटप करण्यात आले.

याप्रसंगी न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, सचिवा अर्पिताराजे भोसले, कु.तेजस्वी भोसले, गीतांजली अमोल शिंदे, नंदा चव्हाण, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, विशाला अभय दिवाणजी, निंगुताई हिंडोळे, खजिनदार स्मिता कदम, डॉ.असावरी पेडगावकर, कोमल क्षीरसागर, अंजना भोसले, सुवर्णा घाडगे, पल्लवी नवले, क्रांती वाकडे, कविता वाकडे, स्वप्ना माने, वैशाली यादव, रेखा पवार, पल्लवी कदम, स्वाती निकम, रेखा पवार, राजश्री माने, छाया पवार, अंजना भोसले, हर्षदा पवार यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, अरविंद शिंदे, सनी सोनटक्के, रमेश केत, संदीप सुरवसे, वैभव नवले, अभियंता अमित थोरात, पिंटू साठे, प्रवीण घाडगे, विजय माने, रोहित खोबरे, विराग माणिकशेट्टी, राहुल इंडे, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, परशुराम बिराजदार, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सतिश महिंद्रकर, गोरखनाथ माळी, प्रा.मनोज जगताप, मनोज इंगोले, सुमित कल्याणी, खाजप्पा गायकवाड, नामा भोसले, सोमकांत कुलकर्णी, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, देवा हंजगे, संभाजीराव पवार, प्रसाद हुल्ले, बाबुशा महिंद्रकर रमेश हेगडे, राजेश काटकर, राजू पवार, गोविंदराव शिंदे, रवी श्रीमान, काशिनाथ वाले, वैभव मोरे, सौरभ मोरे, फहीम पिरजादे, बलभीम पवार, प्रीतीश किलजे, किरण साठे, गणेश लांडगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पू पुजारी व बाळासाहेब घाडगे यांनी केले.