श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा ३६ वा. वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने सोमवारी संपन्न झाला.

अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा ३६ वा. वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने सोमवारी संपन्न झाला.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असीमकृपेने, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ हे ३६ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करुन नेत्रदीपक वाटचाल करीत आहे.

दरम्यान गुरूपौर्णिमे निमित्त या कार्यक्रमात सकाळी ७ ते ९ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वाजता महानवैद्य आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार निरंजन डावखरे, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, संजय शिंदे (पालखी संयोजक लांजा), अशोक बांदल (देणगीदार, खेड शिवापूर, पुणे) यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्रींना दाखविण्यात आला. त्यानंतर अन्नछत्र मंडळात मान्यवरांच्या हस्ते संकल्प सोडल्यावर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आले व याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

या विविध कार्यक्रमास बाळासाहेब दाभेकर पुणे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, केदारनाथ बेंगळूर,
संदीप फुगे-पाटील, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, भाऊ कापसे, विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, अप्पा हंचाटे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, डॉ.प्रसाद प्रधान, जेष्ठ पत्रकार अप्पा गोटे, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, मनोज निकम, किशोर सिद्धे, संदीप सुरवसे, प्रथमेश पवार, रमेश केत, मारुतीराव बावडे, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, श्रीकांत झिपरे, रोहित खोबरे, प्रविण देशमुख, वैभव मोरे, सौरभ मोरे, संजय गोंडाळ, राजाभाऊ नवले, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, सनी सोनटक्के, पिंटू दोडमनी, गोटू माने, रामचंद्र समाणे, अविनाश मडीखांबे, केदार माळशेट्टी, नागनाथ कुंभार, श्रीशैल कुंभार, अरुण जाधव, किरण जाधव, प्रदीप पाटील, अभिजित लोकापुरे, रोहन शिर्के, योगेश पवार, अप्पा हंचाटे, मैनुद्दीन कोरबु, शबाब शेख, दत्ता माने, मुन्ना कोल्हे, बाळू पोळ, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, राजेंद्र पवार, बाळासाहेब घाडगे, सिद्धेश्वर हत्तुरे, स्वामिनाथ बाबर, योगेश पवार, सागर शिंदे, अमोल राजपूत, पिंटू साठे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, राहुल इंडे, सुमित कल्याणी, सिध्दाराम टाके, प्रथमेश जोजन, शिवू कापसे, विराज माणिकशेट्टी, अमोल कोळी, स्वामीराव मोरे, स्वामींनाथ गुरव आदीजण उपस्थितीत होते.

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात असलेले यात्रीनिवास, यात्रीभुवन गेल्या दोन दिवसापासून हाऊसफुल्ल झालेले होते. मंडळाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाकरिता गर्दी झालेली होती.

गेल्या १० दिवसापासून श्री गुरु पौर्णिमा व ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, किर्तन या कार्यक्रमासह गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी महाप्रसाद भक्तांना वाटप होण्याकरिता नेटके नियोजन केलेले होते.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे राज्यातील एकमेव असे महाप्रसादालय आहे की, यथाशक्ती देणगीतून गेल्या ३६ वर्षापासून अविरत सुरु आहे. भक्तांना देणगीबाबत कोणतेही बंधन नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्मांची साथ देणारे मंडळ आहे. या महाप्रसादाने आत्मा तृप्त होतो व मोठ समाधान मिळते. मंडळाच्या वर्धापन दिनास शुभेच्छा व उत्तरोत्तर मंडळाचे प्रगती व्हावे ही श्रीचरणी प्रार्थना अशा शुभेच्छा आमदार सचिन कल्याणशेट्टी दिले. विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वसंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन व आभार श्वेता हुल्ले यांनी मानले.

शेकडो भक्तांनी केले रक्तदान :
गेल्या १० ते १२ दिवसापासून श्री गुरु पौर्णिमा व ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर येथील विविध रक्तपेढीने अन्नछत्र मंडळात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो स्वामी भक्तांनी रक्तदान केले.


चोख बंदोबस्त :
श्री गुरु पौर्णिमा व ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी चोख पोलीस बंदोबस्त मंदिर व न्यासाच्या परिसरात लावण्यात आला होता