श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ… श्री गणेश उत्सव-२०२३

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात पार्थिव गणपतीची सालाबादप्रमाणे न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व कु. हर्षवर्धनराजे भोसले, कु. स्वामींनीराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत पूजा, अभिषेक करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

शमीवृक्षाखाली गेल्या ३३ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमीविघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.

या प्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, अँड.संतोष खोबरे, मैनुद्दीन कोरबू, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, मुख्य आचारी बाळासाहेब पोळ, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, निखील पाटील, राजू पवार, संभाजीराव पवार, पिंटू साठे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, शहाजीबापू यादव, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विकास पवार, दादा सोमवंशी, सोमनाथ शिंदे, गोरख माळी, तानाजी पाटील, गणेश लांडगे, राहुल इंडे, श्रीशैल कुंभार, श्रीकांत स्वामी, दत्ता झंपले, दिनेश भाले, चंद्रकांत कुंभार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.