सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी अन्नछत्र मंडळात श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळ्यानिमित्त मंडळात सकाळी सोलापूर येथील महिला भजनी मंडळाने सेवा रुजू केली. त्या बरोबरच श्रींच्या महानैवेद्य पूजन भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींचा पाळणा, पूजन, शेकडो भक्तांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. नैवेद्याचा संकल्प सोडल्या नंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. या वेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

विधीवत पूजन मंत्र पठन न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी, विश्वंभर पुजारी यांनी केले. स्वामीभक्तांना कडक उनापासून बचाव करण्यासाठी न्यासाने महाप्रसादलया समोर भव्य ग्रीन नेट मारण्यात आल्याने भाविकातून समाधान व्यक्त करण्यात आले. गर्दीमुळे महाप्रसादलया सह शेजारील असलेल्या जागेत देखील महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली होती. ज्यावेळी गर्दी असते त्यावेळी सदरचे नियोजन न्यासाकडून करण्यात येत असते. न्यासाच्या नियोजन व व्यवस्थापनाबाबत भाविकांकडून कौतुक व स्वागत करण्यात आले.