सोलापूर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ व लोकमंगल कॉलेज वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळ्यात समाजगौरव पुरस्कार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांना जाहीर करण्यात आला होता. त्यांच्यावतीने न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी आमदार सुभाष देशमुख व माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारले.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक दत्तामामा मुळे, सोसायटी क्रिडा शिक्षक महासंघाचे भारत इंगोले आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे व लोकमंगल कॉलेजचे अमोलराजे भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमास श्रीक्षेत्र अक्कलकोहून राजाभाऊ नवले, विराज माणिकशेट्टी, प्रविण घाटगे उपस्थित होते.