श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वछस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात गेल्या ३६ वर्षात उत्तुंग भरारी घातलेले आहे. या कार्याची दखल विविध माध्यमातून घेतलेली असून, यामध्ये बँकिंग क्षेत्र देखील मागे राहिलेले नांही., स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सी.एस.आर. निधीतून ताशी ५०० ताट, वाट्या व ग्लास धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र (डिश वॉशर मशीन) अन्नछत्र मंडळाला भेट देण्यात आली आहे.
दरम्यान अत्याधुनिक यंत्राचे (डिश वॉशर मशीन) पूजन न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक पंकजकुमार बरनवाल, राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या पत्नी निलमताई सामंत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक निशांत जयस्वाल, अक्कलकोट शाखेचे व्यवस्थापक विकास खडतकर, माजी व्यवस्थापक अनंत दिवाणजी, न्यासाचे लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, न्यासाचे अभियंता किरण पाटील, अमित थोरात यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात स्वामी भक्तांची वाढती गर्दी पाहता न्यासाकडून भक्त सेवेर्थ विविध उपाययोजना करण्यामध्ये नेहमीच पुढाकार असतो. एका छताखाली न्यासाकडून महाप्रसादा बरोबरच पर्यटनाची सुविधा उपलब्द केलेली आहे. ही उल्लेखनीय असून, भक्तातून नेहमीच कौतुकास्पद असे कार्य न्यासाकडून होत आहे.
याप्रसंगी गोटू माने, निखील पाटील, सतीश महिंद्रकर, प्रकाश लोंढे, कुमार सलबत्ते, बाळासाहेब घाटगे, शहाजीबापू यादव, नामा भोसले, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, रमेश हेगडे, सिद्धराम कल्याणी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, लाला निंबाळकर, विश्वनाथ कलशेट्टी, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, सतीश महिंद्रकर यांच्यासह भक्तगण, सेवेकरी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.