गणेश वंदना, निघाले घेऊन दत्तांची पालखी, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, पहिले मी तुला.., आधीर मन झाले, देशभक्तीपर, भक्ती व भावगीतासह चित्रपटातील मराठी-हिंदी गीते स्वामिनी प्रस्तुत ‘हिटस् ऑफ कुमार शानु’ लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते –संदीप पाटील आणि सहकलाकार पुणे यांचा या कार्यक्रमास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, शनिवार सायंकाळी ७ वा. स्वामिनी प्रस्तुत ‘हिटस् ऑफ कुमार शानु’ सादरकर्ते –संदीप पाटील आणि सहकलाकार पुणे यांचा सायंकाळी ७ वा. ‘अमर लता’ ह्या कार्यक्रमाने ९ वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवानंद पाटील, करमाळा पं.स. माजी सभापती भारतमामा शिंदे, संदीप फुगे-पाटील, आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील बंडगर, मराठा मंदिरचे सरचिटणीस दीपक देशमुख, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे, लाला राठोड व राजेंद्र लिंबीतोटे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांसह कलाकारांचा न्यासाच्या वतीने प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अनुया फुगे-पाटील, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, क्रांती वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, कॉंग्रेस महिला शहर अध्यक्षा सुनिता हडलगी, शिवसेना महिला आघाडीच्या वैशाली हावनुर व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, दिलीप सिद्धे, मनोज निकम, शिवराज स्वामी, गोपी पाटील, प्रदीप जगताप, गजेंद्र घाटगे, मधुकर सुरवसे, सुधाकर सुरवसे, शंकराव सुरवसे, प्रथमेश इंगळे, स्वामीराव मोरे, योगेश पवार, रोहित खोबरे, श्रीकांत मलवे, अतिश पवार, राजु नवले, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाटगे, गोटू माने, अमित थोरात, किरण पाटील, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, अरविंद शिंदे, प्रथमेश पवार, श्रीशैल कुंभार, अप्पू कलबुर्गी, सौरभ मोरे, वैभव मोरे, राहुल इंडे, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, महादेव अनगले, सनी सोनटक्के व राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसन्न बिराजदार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, गोविंदराव शिंदे, आकाश शिंदे, धानप्पा उमदी, दीपक जरीपटके, अशोक स्थावरमठ, सुरेश रूगे, प्रकश घिवारे, सिध्दाराम भंडारकवटे, राहुल माने, मनोज इंगोले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.
गुणीजन गौरव :
गोगाव सरपंच सौ. वनिता मधुकर सुरवसे, सांगवी पोलीस पाटील सौ.शुभांगी प्रवीणकुमार बाबर, शिव-बसव –डॉ.बी.आर.आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष संदीप मडीखांबे, एस.टी.महामंडळ अक्कलकोट आगर चालक सिद्धू जोडमुटे, वाहक वैभव नवगिरे, नगर परिषदेचे रवींद्र श्रीमान, अन्नछत्र मंडळातील यात्रीनिवास, यात्रीभुवनचे व्यवस्थापक गणेश पाटील, सफाईगार श्रीमती कमलाबाई देडे, महाप्रसादगृह वाढपी गजेंद्र इंगळे यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
रविवार दि. २ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सूर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे.