हिरकणी सखी मंच्याकडून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त न्यासाच्या प्रांगणात भव्य दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त न्यासाच्या प्रांगणात भव्य दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लख..! लख..!! दिव्यांनी न्यासाचा परिसर उजळून निघाला होता.

हिरकणी सखी मंच्याकडून महाप्रसाद गृहा समोरील कपिला गाय येथे विविध आकर्षक फुलाच्या माध्यमातून स्वस्तिक, ओम, महादेव पिंड, श्री स्वामी समर्थ ही सचित्रे साकारण्यात आली होती. व न्यासाच्या प्रांगणात दीप लाऊन भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.

सदरचा कार्यक्रम संस्थेचे आधारस्तंभ व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

कार्तिक पौर्णिमेला धार्मिकतेत महत्व असून यानिमित्त सालाबादाप्रमाणे न्यासाकडून यंदा हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून दीपोत्सव या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. न्यासाच्या परिसरात विविध ठिकाणी दीपोत्सव करण्यात आले होते. त्रिपूर पौर्णिमेनिमित्त त्रिपूर वाती लावण्याची परंपरा असून, यादिवशी शंकराने तीन असुरांचा वध केला, अशीही आख्यायिका आहे. त्यामुळे यादिवशी त्रिपूर वात लावली जाते. म्हणून हिरकणी सखी मंच्याकडून दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते.

कार्तिकी एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी दीपोत्सवाला महत्व आहे. म्हणूनच हिरकणी सखी मंच्याकडून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त न्यासाच्या प्रांगणात भव्य दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, सचिवा अर्पिताराजे भोसले, खजिनदार स्मिता कदम, अंजना भोसले, सुवर्णा घाडगे, पल्लवी नवले, क्रांती वाकडे, कविता वाकडे, स्वप्ना माने, वैशाली यादव, रेखा पवार यांच्यासह महिला वर्ग, सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान न्यासाच्या यात्री निवास येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व कोल्हापूर येथील भक्ती गंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रांगोळी साकारून लक्षदिपोत्सव करण्यात आला. याचे उद्घाटन हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या हिरकणी सखी मंच्याकडून करण्यात आले. प्रतिष्ठानने यात्री निवास ते महाप्रसादलया पर्यंत दीपोत्सव केले होते. न्यासाच्या परिसरातील श्रीदत्त मंदिरा समोर दीपोत्सव संपन्न झाला.