श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळामुळे सांस्कृतिक वारसा लाभला असून, उपस्थित माता भगिनींच्या चेहर्यातवरील आनंद पाहून भरून भारावलो अशी प्रतिक्रीया सुप्रसिध्द अभिनेते आदेश बांदेकर यांचा खेळ मांडियेला कार्यक्रमाच्या वेळी मनोगतातून व्यक्त केले. महाराष्ट्रभर गाजलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या कार्यक्रमासाठी महिलांची अक्षरशः झुंबड पडली होती. दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याच्या हेतुने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, शनिवार दि. १३ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. अभिनेते आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडीयेला’ (खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी) ह्या कार्यक्रमाने तिसरे पुष्प संपन्न झाले. याप्रसंगी आदेश बांदेकर बोलत होते. यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. कार्यक्रमाचे सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन श्री राजेराय मठाचे अध्यक्ष अँड.शरदराव फुटाणे-जाधव, हिरकणी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.अलकाताई भोसले, सचिवा अर्पिताराजे भोसले, सौ.वैशाली लिंबीतोटे, माजी नागराधाक्षा अनिता खोबरे, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, न्यासाचे क्रियाशील सदस्य सरोजिनी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी लकी ड्रॉचे कुपन देण्यात येत होते. मंचावर महिलांसह विविध खेळ, गप्पा, चर्चा करत कार्यक्रम मोठ्या उत्साहात मंगलमय वातावरणात पार पडला. विजेत्या महिलांना मानाच्या ५ पैठणी, २०० घड्याळ पारितोषिक म्हणून देण्यात आले.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावेत या अनुषंगाने महाराष्ट्रभर गाजत असलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळ मांडियेला संपन्न झाला. शेकडो माता-भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. सुप्रसिध्द अभिनेते आदेश बांदेकर व कलाकार यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.