छत्रपती संभाजीराजे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी स्वराज्याची पहिली मुद्रा उमटवली, १८ व्या वर्षी युवराज झाले. त्या काळात त्यांनी विविध क्षेत्रात केलेले कार्य हे उल्लेखनीय होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे संकल्पित कार्य स्वराज्याच्या हितार्थ शंभूराजेंनी केले असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, सोमवार दि. १५ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. ख्यातनाम व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर व्याख्यानाने ५ वे पुष्प संपन्न झाले.
पुढे बोलताना प्रा.बानुगडे-पाटील यांनी म्हणाले की, शिवरायांडून कसे जगावे हे शिकावे तर संभाजी राजांकडून कसे मरावे हे शिकावे. प्रतिकूल परिस्थिती अनकूल कशी करावी हे छत्रपती संभाजी राजांचे चरित्र अभ्यासले की लक्षात येतो. आपला इतिहास उज्जवल आहे. तसाच आपला वर्तमान व भविष्यकाळही उज्जवल करता आला पाहिजे, असे यावेळी म्हणाले. शंभूराजेंचा धगधगता इतिहास सांगून उपस्थित श्रोते गणांना प्रा.बानुगडे-पाटील यांनी मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सो.म.पा माजी उपमहापौर दिलीपभाऊ कोल्हे, दहीटणेचे शिवाजीराव पाटील (सर), भाजपा नेते रमेश सिद्रामप्पा पाटील, जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, जेष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर, डॉ.आर.व्ही.पाटील, राजीव माने, बाळासाहेब मोरे, अॅड.संतोष खोबरे, अविराज सिद्धे, विजय पोखरकर, जवहार जाजू, शेखर फंड, श्रीशैल होळ्ळे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.