श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे एक धार्मिक प्रेरणा स्रोत असून मनाला ऊर्जा देणारे न्यास असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांनी न्यासाच्या परिसर हा स्वच्छ व सुंदर, मनाला समाधान वाटणारे असून, आदरभाव या गोष्टी मनाला निखळ आनंद देणारे असल्याचे मनोगत दैनिक सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व राष्ट्रीय उद्योग परिषदेचे प्रमुख अभिजीत पवार यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वेस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती व प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी अभिजित पवार यांनी शिवश्रुष्टी, धातूशिल्प, शिवस्मारक तसेच समर्थ वाटिका अन्नछत्र मंडळ परिसर येथे भेट देऊन पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी सोलापूर दैनिक सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी,अंकित काणे, अजय धाराशिवकर व मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, सतिश महिंद्रकर, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, अभियंता अमित थोरात, बाळासाहेब घाडगे, सनी सोनटक्के, अप्पा हंचाटे, पुरोहित अप्पू पुजारी, पिंटू साठे, गोरखनाथ माळी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.