भारतरत्न, गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने प्रतिमेला पुष्पांजलीने अभिवादन करण्यात आले. या पुण्यस्मरण दिनी अन्नछत्र मंडळाकडून संकल्प पूजा संपन्न होऊन स्वामीभक्तांना महाप्रसाद देण्यात आला.
भारतरत्न, गानसम्राज्ञी, लतादिदी मंगेशकर यांचे अन्नछत्राचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराजांवर अगदी पुत्रवत प्रेम होते. त्यांची छत्रपतींच्या घराण्यावर उदंड श्रध्दा होती. त्या वेळोवेळी अन्नछत्रास मदत करीत व सदैव मार्गदर्शन करीत होत्या. लतादीदीनी त्यांच्या स्वामीगीतांच्या लाखो सिडी अन्नछत्रास मंडळास मोफत दिल्या आहेत. त्या नेहमी अन्नदानास देणगी देऊन मदत करीत होत्या.
न्यासाच्या परिसरातील शिवसृष्टी व शिवचरित्र धातुशिल्प ही संकल्पना त्यांचीच आहे. तसेच त्यांनी स्वत:च्या महागड्या गाड्या (मर्सिडीज व शोव्हरलेट) जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना भेट म्हणून दिल्या आहेत. त्यांचा आणि त्यांच्या सर्व परिवारांशी जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा नेहमीच सुसंवाद आहे.
पं. हृदयनाथजी मंगेशकर, उषाताई मंगेशकर, मीनाताई खडीकर, आशाताई भोसले यांच्याशी जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांची खूप जवळीक आहे.
मीनाताई मंगेशकर – खडीकर लिखीत ‘मोठी तिची सावली” ह्या लतादिदींच्या आत्मचरित्रपर ग्रंथामध्ये जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा उल्लेख घरातील माणसे असा केले आहेत. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज हे अन्नछत्रास येणाऱ्या भक्तांची खूप संवेदनशील आहेत. अन्नछत्रात येणाऱ्या स्वामीभक्त हा स्वामी रूप असून, त्यांच्या रुपात श्री स्वामींचा आशीर्वाद हे अन्नछत्रासाठी तारक आहे अशी लतादीदिंची श्रद्धा होती.
यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे,उपाध्यक्ष अभय खोबरे ,बाळासाहेब देसाई कुलकर्णी, विश्वस्त संतोष भोसले, नितीन शिंदे, मनोज निकम,पिटू साठे, निखिल पाटील, पुरोहित अप्पू पुजारी, बालाजी कटारे,स्वामीनाथ गुरव, अनगले, शावरेप्पा माणकोजी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, अमित थोरात, रोहन शिर्के,स्वामीनाथ बाबर, गोरख माळी, चंद्रकांत हिबारे, निखील पाटील, गोटू माने, प्रविण घाडगे,प्रशांत साठे, दत्ता माने, शरदराव भोसले,राजू पवार,सर्रास शेख,मैनुद्दीन कोरबू,मल्लिकार्जुन बिराजदार,लक्ष्मण बिराजदार,धानप्पा उमदी, संभाजीराव पवार, प्रसाद हुल्ले, अनिल बिराजदार, तानाजी पाटील, श्रीनिवास गंवडी, रमेश हेगडे,संभाजीराव पवार, शिवू स्वामी, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, दतात्रय झंपले,पंढरीनाथ लोखंडे, धनंजय माने, नवनाथ सुतार, सुभाष पेठकर, गजेंद्र इंगळे, राजेंद्र झंपले, प्रशांत गुंजले,नामा भोसले, सुमित कल्याणी,खाजपपा गायकवाड यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.