मा.श्री.जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांचा गौरव

अकलूज येथे मराठा सेवा संघ यांच्या वतीने आयोजित महाअधिवेशनात सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानाबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी श्री मदनसिंह मोहिते पाटील, अभिनेते श्री किरण माने, मराठ सेवा संघ अध्यक्ष श्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब, शाहिर कांबळे व मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उद्योजक, व्यापारी, महिला भगिनी, समाजातील नेते , न्यासाचे पदाधिकारी, समाजसेवक व इतर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.