श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री गणेश जयंती गुरुवारी न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मोठ्या भक्ती भावाने उत्साहात साजरी करण्यात आली.
दरम्यान न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्पिताराजे अमोलराजे भोसले व तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली. त्या नंतर श्रींचा पाळणा उत्सव महिलांच्या उपस्थितीत पार पडला. सकाळ पासून माऊली भजनी मंडळ, सोलापूर यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. पाळणा कार्यक्रमा नंतर आरती, महाप्रसाद आदी उपस्थित भक्तांना देण्यात आला. विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने संपन्न झाली.
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर:-
श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे सन १९८८ च्या श्री गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या नंतरच्या काळात न्यासाच्या आवारात सन १९९० साली जमिनीची झाडी, झुडपे काढून साफ-सफाई व सपाटीकरण करीत असताना जमिनीच्या मध्यवर्ती भागात शमीवृक्ष आढळला. तेथे सपाटीकरण करते वेळेस श्री गणेशाची सुंदर मूर्ती आढळली. त्याच शमीवृक्षाखाली ३४ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर बांधण्यात आले आहे.
या कार्यक्रमास स्वाती निकम, स्मिता कदम, रूपा पवार, सुवर्णा घाटगे, कविता वाकडे, अनिता गडदे, छाया पवार, तृप्ती बाबर, कविता भोसले, स्वप्ना माने, उज्वला भोसले, संगीता भोसले, आशा पाटील, हर्षदा पवार, संध्या सूर्यवंशी, दिव्या मोरे, विजयालक्ष्मी लोणी, वैशाली यादव, मंगल पाटील, विनता पाटील न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त लक्ष्मण पाटील, सौरभ मोरे यांच्या सह माऊली भजनी मंडळ, सोलापूरचे मिनाक्षी शिंदे, प्रज्ञा निंबाळकर, छाया देशमुख, माधुरी देऊरगावकर, वैशाली भोसले, शेवंता भोसले, जयश्री खरात, रेणुका टेकडे, ऋषिकेश काळे, सुनिता जाधव यांच्या सह अप्पा हंचाटे, आतिष पवार, गोटू माने, प्रवीण घाडगे, रमेश हेगडे, बाळासाहेब घाडगे, नामा भोसले, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बाबुशा महिंद्रकर, विनायक भोसले, सागर पवार, शंकर पोतदार, समर्थ चव्हाण, यांच्या सह स्वामी भक्त बहु संख्येने उपस्थित होते.




