श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, शुक्रवारी सायंकाळी श्री तुळजाभवानी माता मंदिरात देवीची महापूजा व आरती न्यासाचे सचिव शामराव मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सरोजनीताई शामराव मोरे यांच्या हस्ते संपन्न झाली.
दरम्यान न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, विश्वंभर पुजारी, संजय कुलकर्णी व सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने महापूजा संपन्न झाले. आरती नंतर उपस्थिताना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व हिरकणी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.अलकाताई जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जाणता राजा युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगाचा भव्य हालत्या देखावा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
यावेळी कु. तेजस्विनी अमोलराजे भोसले, संध्या काळे-मोरे, सविता खोबरे, दर्शना लेंगडे-खबरे व न्यासाचे विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे, दिगंबर दुर्गकर, सौरभ मोरे, रोहित खोबरे, अप्पा हंचाटे, बाळासाहेब कुलकर्णी, अशापक काजी, पिंटू साठे, निखिल पाटील, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, वैभव मोरे, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, नामा भोसले, सतिश महिंद्रकर, रोहन शिर्के, पप्पू वाकडे, राजेंद्र काटकर, बाबुशा महिंद्रकर, राजू पवार, प्रसाद हुल्ले, कल्याणी देशमुख, श्रीनिवास गवंडी, स्वामींनाथ बाबर, योगेश पवार, लक्ष्मण बिराजदार, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, विशाल कलबुर्गी, सुमित कल्याणी, तानाजी पाटील, राहुल इंडे, महांतेश स्वामी, चंद्रकांत हिबारे, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, शिवु स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्या सह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते