श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात बुधवार रोजी सायंकाळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते पूजन

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात बुधवार रोजी सायंकाळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

गेल्या दोन दिवसापासून श्रींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. सदरील पुजा ही दि. २८ सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. शमीवृक्षाखाली गेल्या ३३ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमीविघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.

या प्रसंगी मनोज निकम, वैभव नवले, सौरभ मोरे, रोहित खोबरे, वैभव मोरे, पुरोहित संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, अभियंता किरण पाटील, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, सागर गोंडाळ, राजू पवार, अप्पा हंचाटे, संभाजीराव पवार, पिंटू साठे, बाबुशा महिंद्रकर, दत्ता माने, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, अनिल गवळी,
धानप्पा उमदी, प्रसाद हुल्ले, राहुल इंडे, महांतेश स्वामी, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, रमेश हेगडे, स्वामींनाथ बाबर, ज्ञानेश्वर भोसले, चंद्रकांत कुंभार, गणेश पाटील, बसवराज क्यार, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.


श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा tv9 ग्रुपच्या वतीने दिला जाणारा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.