श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वीस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या अन्नछत्रमध्ये व्यवस्था बघून खूप आनंद झाला. इथे स्वच्छ आणि पौष्टिक अन्न भाविकांसाठी उपलब्द असल्याचे मनोगत प्रसिध्द मराठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी दै.संचारचे उपसंपादक व आकाशवाणीचे बातमीदार प्रशांत जोशी यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, नामा भोसले, दत्ता माने, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.