भारतरत्न, गानसम्राज्ञी स्व.लतादीदी मंगेशकर यांच्या जयंती निमित्त, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पांजलीने अभिवादन करण्यात आले.
स्व.भारतरत्न, गानसम्राज्ञी, लतादिदी मंगेशकर यांचे अन्नछत्राचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराजांवर अगदी पुत्रवत प्रेम होते. त्यांची छत्रपतींच्या घराण्यावर उदंड श्रध्दा होती. त्या वेळोवेळी अन्नछत्रास मदत करीत व सदैव मार्गदर्शन करीत होत्या. स्व.लतादीदीनी त्यांच्या स्वामीगीतांच्या लाखो सिडी अन्नछत्रास मोफत दिल्या आहेत. त्या नेहमी अन्नदानास देणगी देऊन मदत करीत होत्या.
न्यासाच्या परिसरातील शिवसृष्टी व शिवचरित्र धातुशिल्प ही संकल्पना त्यांचीच आहे. तसेच त्यांनी स्वत:च्या महागड्या गाड्या (मर्सिडीज व शोव्हरलेट) जन्मेजयराजे यांना भेट म्हणून दिल्या आहेत. त्यांचा आणि त्यांच्या सर्व परिवारांशी जन्मेजयराजे यांचा नेहमीच सुसंवाद होता. पं. हृदयनाथजी मंगेशकर, उषाताई मंगेशकर, मीनाताई खडीकर, आशाताई भोसले यांचेशी महाराजांची खूप जवळीक आहेत.
मीनाताई मंगेशकर – खडीकर लिखीत मोठी तिची सावली ह्या लतादिदींच्या आत्मचरित्रपर ग्रंथामध्ये जन्मेजयराजे भोसले यांचा उल्लेख घरातील माणसे असा केले आहेत. जन्मेजयराजे भोसले महाराज हे अन्नछत्रास येणाऱ्या भक्तांची खूप संवेदनाक्ष आहेत. अन्नछत्रात येणाऱ्या स्वामीभक्त हा स्वामी रूप असून, त्यांच्या रुपात श्री स्वामींचा आशीर्वाद हे अन्नछत्रासाठी तारक आहे अशी स्व.लतादीदिंची श्रद्धा होती.