


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिकरणी महिला बहुउद्देशिय संस्थेस श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व आधार स्तंभ अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून, संस्थापिका अध्यक्षा अलकाताई जन्मेजयराजे भोसले, सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले व त्यांच्या टिमच्या माध्यमातून श्री क्षेत्र अक्कलकोट पंच क्रोशीतील महिला सबलीकरणा करिता सतत कार्यरत आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे, एकूणच हिकरणी महिला बहुउद्देशिय संस्थेचे काम महिलांना दिशा देणारे असल्याचे मनोगत मनोरमा मल्टीस्टेट सोसायटी सोलापूर चे चेअरमन शोभाताई श्रीकांत मोरे यांनी व्यक्त केल्या.
त्या रविवारी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिकरणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने अन्नछत्र मंडळ प्रांगणातील वाहनतळ शेड मंडपात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे यंदाही सर्व सखी आणि भगिनीनकरिता एक अनोखा मैत्रीचे घट्ट नाते निर्माण व्हावे यासाठी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत मनोरमा मल्टीस्टेट सोसायटी सोलापूर चे चेअरमन शोभाताई श्रीकांत मोरे ह्या बोलत होत्या.
दरम्यान राष्ट्रमाता जिजाऊ, श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना शोभाताई श्रीकांत मोरे म्हणाल्या महिलांनी सर्वच क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण केले पाहिजे महिला आर्थिक, सामाजिक, शारीरिक व संस्कृतीक आणि मानसिक दृष्ट्या, आर्थिक बाबतीत सक्षम असल्या पाहिजे. पुढे बोलताना म्हणाल्या श्री क्षेत्र अक्कलकोट सारख्या ठिकाणी हिकरणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे शोभाताई मोरे म्हणाल्या.
या प्रसंगी विविध कार्यक्रमामध्ये मनोरंजनात्मक खेळ, प्रश्न मंजुषा, बौद्धिक खेळ, गाणे गप्पा गोष्टी आणि गेम्स, आकर्षक भेट वस्तू, टोटल धमाल एन्टरटेन्मेंट विथ न्यु गेम्स अशा अनेक कलांचा संगम असणारा एक अनोखा कार्यक्रमाच्या माध्यमातून सूत्रसंचालक श्वेता हुल्ले यांनी धमाल उडवून दिली. उपस्थित शेकडो महिलांनी सदर कार्यक्रमाना भरभरून दाद दिली. स्पर्धेतील विजेत्या महिलांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमास जयश्रीताई मगर, अनुयाताई फुगे, आरती काळे, रुपाली शहा, मल्लम्मा पसारे, माजी नगराध्यक्षा अनिताताई खोबरे, माजी नगरसेविका सोनालीताई शिंदे, जयश्री सुरवसे, स्नेहल जाधव, सविता खोबरे,, धनश्री पाटील, सौ. चौगुले, सुवर्णा साखरे, संध्या हिप्परगी, वर्षा हिप्परगी, श्रीदेवी शिंदे, लता मोरे, कल्पना मोरे, तृप्ती बाबर, रत्नमाला मचाले, स्मिता कदम, प्रमिला देशमुख, पल्लवी कदम, संगीता भोसले, उज्वला भोसले, स्वाती निकम, छाया पवार, सुवर्णा घाडगे, रूपा पवार, कविता वाकडे, दिव्या मोरे, क्रांती वाकडे, राजश्री माने, स्वप्ना माने, कविता भोसले, अनिता गडदे यांच्यासह पंचक्रोशीतील महिला बहुसंख्ये उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार स्मिता कदम यांनी मानल्या.