या जगाला सुखी व्हायचं असेलतर, हरी नामा शिवाय पर्याय नांही, मीपणा व अहंकार अंगिकारल्यामुळे माणसाच्या जीवनाचा अंत होतो. या दोन गोष्टी पासून माणूस लांब राहिल्यास आनंद व समाधान मिळते असे परखड विचार राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, शनिवारी राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांच्या ‘किर्तन’ कार्यक्रमाने ६ वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर व न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज, व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निवृत्ती महाराजांचे स्वीय सहायक किरण शेटे, मंगेश उपासे, रामेश्वर जाधव, गणेश महाराज हे उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांचा सत्कार न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. याप्रसंगी न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले व उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे हे उपस्थित होते.
न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. या कीर्तनाला श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था पंढरपूर च्या वारकऱ्यांनी साथ दिली. यांच्या समवेत तालुक्यातील कोळेकरवाडी येथील ह.भ.प.चंद्रकांत डांगे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांनी आई-वडील, संत भगवंत या शिवाय माणसाचे जिवन शून्य असून, सध्याच्या विविध घडामोडीवर वृत्ती, वल्ली व कृती या बाबतचे कलियुगातील दाखले देत सडेतोड व परखड विचार व्यक्त करत भक्ती, शक्ती, धर्म-संस्कार प्रबोधन या त्रिवेणी संगमात लाख भक्तजनांना आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनभुती दिली. प्रचंड गर्दीमुळे न्यासाचा परिसरात ठिकठिकाणी स्क्रीनद्वारे प्रक्षेपण करण्यात आले होते.*
अन्नछत्र हे स्वामींचा परिसर :
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नछत्र हे मनोभावे सेवा करणारे संस्था आहे. या माध्यमातून धार्मिक कार्य बरोबरच अन्य उपक्रम देखील हे उल्लेखनीय रित्या राबविल्या जात आहेत.
परखडपणे समाज प्रबोधन :
राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्त महाराज यांनी संत तुकाराम, एकनाथ, निवृत्ती महाराज, ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपान व ज्ञान, देव, ध्यान, नम्रता, लक्ष्मी,मी पणा, संपत्ती, दया, संत देव, सुख समाधान याबाबत उदाहरणासह अभंगातील दाखला देत मन मुराद, उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात सद्य स्थितीवर त्यांनी परखडपणे समाज प्रबोधन केले. श्रीक्षेत्र अक्कलकोट हे गुरु पीठ आहे. या गुरु पिठात अन्नछत्राच्या माध्यमातून सुरु असलेले महाप्रसादा बरोबरच विविध उपक्रमाचे कौतुक केले.