श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, मंगळवारी स्वामिनी प्रस्तुत ‘रजनी गंधा’ सादरकर्ते- संदीप पाटील व सहकारी पुणे ह्या कार्यक्रमाने ९ वे पुष्प संपन्न झाले. या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. या कार्यक्रमास श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती. भक्तीगीते-भावगीते, चित्रपटगीते अशा एक ना अनेक मराठी व हिंदी गानी ख्यातनाम गायक संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘रजनी गंधा’ मध्ये सादर केले. या कार्यक्रमास श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली. सोलापूर चे ख्यातनाम गायक महंमद आयाज यांनी देखील सदर कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
दरम्यान या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंह रजपूत, जेष्ठ पत्रकार राकेश टोळ्ळे, संजीवकुमार, झोनल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर, आदिय कुमार सिंग, किरण कुमार, अॅड. विजय हर्डीकर, विधीज्ञ, अक्कलकोट, उद्योगपती राजकुमार सुरवसे, सागर सोनटक्के सोलापूर, सचिन चव्हाण कोल्हापूर, शैलेश पिसे, जयंत सुभेदार अक्कलकोट, दीपक खैराटकर, डॉ. संतोष मेहता, राजेंद्र मायनाळ अध्यक्ष बसव सेंटर, सतीश भूमकर पुणे, विश्वास कुलकर्णी सोलापूर, बाबुशा महिंद्रकर अक्कलकोट, श्रीमती शिला इंगळे मुंबई, श्रीमती छाया मोदगी-कुलकर्णी नाशिक, श्रीमती नंदिनी पाटील दामनगांव, श्रीमती शकुंतला भोसले सोलापूर, श्रीमती चारुशीला भोसले मुरुड, इस्रो चे शास्त्रज्ञ सचिन खमितकर, राज राठोड सोलापूर, किरण पाटील, स्थापत्य अभियंता, तम्मामामा शेळके सामाजिक कार्यकर्ते, अभिनंदन गांधी, व्यावसायिक, अक्कलकोट, अकिल बागवान, सिद्धेश्वर मोरे, उद्योजक, वळसंग, श्रीमती सरोज मशीलकर, यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते – संदीप पाटील सह पत्नीक, ख्यातनाम गायक महंमद आयाज व सहकारी यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. उद्योजक बसवराज तथा पिंटू दोडमनी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
गुणीजन गौरव : श्री नागेंद्र पंचय्या हिरेमठ,(रुग्णवाहिका चालक) वैद्यकीय सेवा, श्री रामलिंग स्वामी, ( आरोग्य निरीक्षक, हसापुर) वैद्यकीय सेवा, श्री कांतीलाल कल्याणराव जाधव, पोस्टल असिस्टंट, पोस्ट ऑफिस, अक्कलकोट, पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी इंद्रजीत बाभळसुरे दक्षिण पोलीस ठाणे, अक्कलकोट यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ८ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.