श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व सहयोगी संस्था असलेल्या हिकरणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे कार्य उल्लेखनीय व प्रेरणादायी असून महिलांनी परिस्थितीनुसार आजच्या डिजिटल युगात आपल्या जिवनात बदल करणे काळाची गरज आहे, आजी व नातीचे विचार एक व्हायला हवे, याकरिता हस्ताक्षेप केला पाहिजे असे मनोगत जिजाऊ ब्रिगेडच्या सुनंदा राजेगांवकर यांनी व्यक्त केल्या.
त्या येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व सहयोगी संस्था असलेल्या हिकरणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त न्यासाच्या परिसरात असलेल्या कार्यक्रम मंडपात आयोजित गरीब व होतकरू महिलासाठी ‘साडी वाटप’ कार्यक्रम प्रसंगी सुनंदा राजेगांवकर ह्या बोलत होत्या.
दरम्यान मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ, राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी गानसाम्राज्ञी स्व.लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या सुनंदा राजेगांवकर, डॉ.असावरी पेडगावकर, डॉ.सायली बंदिछोडे, गिरिजादेवी राजीमवाले, लता मोरे, माधुरी बाग, विमल पोमाजी, शैलजा वाडे व कार्यक्रमाचे संयोजक व निमंत्रक बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा अलकाताई भोसले व सचिवा अर्पिताराजे भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिकरणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा अलकाताई भोसले व सचिवा अर्पिताराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३०० गरीब व होतकरू महिलांना ‘साडी वाटप’ करण्यात आले.
पुढे बोलताना जिजाऊ ब्रिगेडच्या सुनंदा राजेगांवकर म्हणाल्या की, महिलांनी बदलत्या काळानुसार बदले पाहिजे पूर्वी ८ वारी होती, आता ५ वारी साडी वापरले जाते, पूर्वी जात्यावर दळले जायचे आता मिक्सरचा वापर केला जातो. महिलांना आर्थिक, राजकीय, कौटुंबिक व सामाजिक हक्कासाठी झगडावे लागते असे सांगून सध्याच्या बदलत्या युगातील माहिती सांगून उपस्थित महिलांना सुनंदा राजेगांवकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास संस्थेच्या स्मिता कदम, संगीता भोसले, पल्लवी कदम, स्वाती निकम, प्रमिला देशमुख, उज्वला भोसले, रूपाली पवार, कविता वाकडे, क्रांती वाकडे, स्वप्ना माने, राजश्री माने, सुवर्णा घाडगे, शीला मचाले, छाया पवार, अंजना पवार, यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पल्लवी कदम यांनी केले.