अन्न हे परब्रम्ह आहे ! अन्नदान सर्व श्रेष्ठ दान… असे म्हटले आहे. त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खुप मोठी आहे. अन्नाची गरज ही या भुतलावरील मानवासहीत सर्व प्राणीमाञांना आहे. अन्नग्रहणाने क्षुधा शमतेलअन्नामधे साक्षात र्इश्वराचा वास असतो, त्यामुळे हया महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तॄप्त होतो. एकप्रकारचे मानसिक समाधान मिळते.सध्या या अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस १५००० च्या वर परगांवचे स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात.