श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली रु. ६० कोटीच्या ५ मजली भव्य महाप्रसादगृह इमारतीच्या बांधकामास रविवारी प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला.*
दरम्यान न्यासाच्या ३७ वा. वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या वेळी रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी मोठ्या थाटात व उत्साहात भव्य महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता. रविवार दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी महाप्रसादगृह इमारतीच्या बांधकामास प्रारंभ विधिवत पूजन स्वामी भक्त व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने विधिवत पूजा संपन
*• नेत्रदीपक वाटचाल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असीमकृपेने, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ हे नेत्रदीपक वाटचाल करीत आहे.
*एक दृष्टिक्षेप
होणाऱ्या महाप्रसाद गृहाची इमारत ही भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून, या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार आहे. या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका आहे.