श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, गुरुवारी ‘संगीत रजनी’ मध्ये ख्यातनाम मराठी गायिका बेला शेंडे व सहकारी मुंबई ह्या कार्यक्रमाने चौथे पुष्प संपन्न झाले. या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. या कार्यक्रमास श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती. भक्तीगीते-भावगीते, चित्रपटगीते श्री स्वामी समर्थ…!, पांडुरंगा..!, मन मोहना…!, धुंद वाटेवर…! अशा एक ना अनेक मराठी व हिंदी भावगीते व भक्तीगीतांनी ख्यातनाम गायिका बेला शेंडे यांच्या ‘संगीत रजनी’ मध्ये सदर केल्या.
दरम्यान या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कुलगुरू- सोलापूरचे डॉ. प्रकाश महानवर, गिरीश कणेकर उद्योजक, सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे आर आर सी.मेंबर- डॉ. तानाजी कोळेकर, अॅड. श्री व सौ. मिलिंद थोबडे, कुमठाळे स्पेशलिटी हॉस्पिटल, सोलापूरचे- डॉ. अरविंद कुमठाळे, डॉ. बबीता कुमठाळे, श्री स्वामी समर्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,अक्कलकोटचे- डॉ. श्री. व सौ. योगेश वेळापूरकर, दोंड स्पेशालिटी क्लिनिक, सोलापूरचे- डॉ. प्रशांत दोंड, डॉ.श्री.प्रदिप घिवारे, श्री सुखकर्ता रुग्णालय सोलापूरचे – डॉ.योगीराज बिराजदार, डॉ. वैशालीताई बिराजदार, डॉ.श्री आर. व्ही. पाटील, बार असोशियशन, अक्कलकोटचे अध्यक्ष- अॅड. व्ही.बी. पाटील, अॅड. श्री. व सौ.अनिल मंगरुळे, योगेश अहंकारी(आर्किटेक्ट), स्टेट बँक ऑफ इंडिया, सोलापूरचे रिजनल मॅनेजर- आनंदकुमार पाटकर, सो.म.पा. उपायुक्त आशिष लोकरे, कांचनमाला निंबाळकर कोल्हापूर, मीनाताई शिंदे, बंडोपंत कुलकर्णी, सुनील घाटे, विजय साठे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते – सौरभ दप्तरदार, मथुरा गद्रे, विक्रम भट, अभिजित भदे, ऋतुराज कोरे, अमान सय्यद, अमित गाडगीळ, विशाल शेलकर, मोहित नामजोशी, मोहिर अटकलकर यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.
गुणीजन गौरव : डॉ.गिरीश बाजीराव साळुंखे,अक्कलकोट, डॉ. बाबासाहेब व्हनमाने, निलेश नाथा बागाव, सहा.पोलिस निरीक्षक, उत्तर पोलिस ठाणे, अक्कलकोट, अश्विनी इंद्रजीत बाभळसुरे, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे, श्री महादेव रामा जंबगी, (पत्रकार, साप्ताहिक श्री संकेत), पानं मंगरूळ यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
हे आमचे भाग्य:- श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या कार्यक्रमात मला व माझ्या टिमला संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे. या विविध कार्यक्रमाकरिता खूप खूप शुभेच्छा!
बेला शेंडे
गायिका