गुरूपौर्णिमा २०२४ – १० वे पुष्प

श्री स्वामी समर्थ..! मन हा मोगरा…!, स्वामी तुझ्या नावाने..!, माझी आई अक्कलकोटी..!, जय जय स्वामी समर्थ..!!, विठ्ठल..! विठ्ठल..!!, देशभक्तीपर, भक्ती व भावगीतासह चित्रपटातील मराठी-हिंदी गीते श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सूर भक्तीचे उमटले भक्ती संगीत ह्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवनिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, दि. २० जुलै रोजी शनिवार सायंकाळी ७ वा. श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सुर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत ह्या कार्यक्रमाने १० वे पुष्प संपन्न झाले. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन न्यासाचे विश्वस्त अण्णा थोरात पुणे, भरत मित्र मंडळाचे बाळासाहेब दाभेकर, शिरीष मावळे पुणे, मदनिपाशा जुनैदी –आगार व्यवस्थापक, श्री व सौ अनिल पाटील ठाणे, प्रकाश पडवळकर, भाऊसाहेब घाडगे, धनंजय वाडकर, योगेश अहंकारी उपस्थित होते.