गुरुपोर्णिमा उत्सव २०२५ – खेळ मांडीयेला आदेश बांदेकर यांच्या सोबत

श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मुळे सांस्कृतिक वारसा लाभला असून, गेल्या २६ वर्षापासून धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने कलाकारांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य घडत आहे, उपस्थित माता भगिनींच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून भारावलो अशी प्रतिक्रीया ख्यातनाम अभिनेते आदेश बांदेकर यांचा “खेळ मांडियेला” कार्यक्रमाच्या वेळी मनोगतातून व्यक्त केले. महाराष्ट्रभर गाजलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या कार्यक्रमासाठी महिलांची अक्षरशः झुंबड पडली होती. दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याच्या हेतुने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, मंगळवार दि. १ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. अभिनेते आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडीयेला’ (खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी) ह्या कार्यक्रमाने दुसरे पुष्प संपन्न झाले. याप्रसंगी आदेश बांदेकर बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल नामाने करण्यात आली.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूरच्या डॉ.प्रगती बागल, मनोरमा मल्टीस्टेट को. ऑप. क्रे. सोसायटी, सोलापूरच्या चेअरमन- शोभा मोरे, सोलापूरच्या डॉ.रोहिणी देशपांडे, श्रीमती मल्लमा पसारे, डॉ.आसावरी पेडगावकर, श्रीमती किशोरी शहा, न्यासाचे विश्वस्त व हिरकणी संस्थेच्या- संस्थापक अध्यक्षा सौ.अलकाताई जनमेजयराजे भोसले, न्यासाचे विश्वस्त व हिरकणी संस्थेच्या – सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले, न्यासाचे विश्वस्त व माजी नगराध्यक्षा- अनिता खोबरे, हिरकणी संस्थेच्या उपाध्यक्षा- रत्नमाला मचाले, न्यासाचे क्रियाशील सदस्य सरोजिनी मोरे, तृप्ती पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी लकी ड्रॉचे कुपन देण्यात येत होते. मंचावर महिलांसह विविध खेळ, गप्पा, चर्चा करत कार्यक्रम मोठ्या उत्साहात मंगलमय वातावरणात पार पडला. विजेत्या महिलांना मानाच्या ५ पैठणी, २५० घड्याळ पारितोषिक म्हणून देण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी केले.


अन्नछत्र मंडळ हे सुंदर व पवित्र ठिकाण :
श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मुळे सांस्कृतिक वारसा लाभला आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे सुंदर व पवित्र ठिकाण असून, सेवा करण्याची संधी मला लाभत आहे.
-अभिनेते आदेश बांदेकर


विशेष गौरव : कु. शर्विल संतोष माळवदकर सोलापूर (क्रीडा व स्केटिंग) चा विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गुणीजन गौरव : प्रा.जयश्रीताई बिराजदार, (सी.बी.खेडगी कॉलेज अक्कलकोट), श्रीमती रत्नाबाई गुरुबसप्पा घंटे (आदर्श उद्योजिका), सिद्राम भिमशा मुली (नूतन विद्यालय पान मंगळूर), श्रीमती अलका सुभाष साळुंखे,( सेवेकरी) यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.